AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंदोलनापूर्वीच कॉकरोच जनता पार्टीला मोठा दणका, पोलिसांनी कार्यकर्त्यांना थेट..

कॉकरोच जनता पार्टीचे उद्या दिल्लीत आंदोलन आहे. या आंदोलनापूर्वी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला. नागपूर पोलिसांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली आहे. यासोबतच त्यात त्यांनी काही गोष्टीची माहिती मागितली आहे.

आंदोलनापूर्वीच कॉकरोच जनता पार्टीला मोठा दणका, पोलिसांनी कार्यकर्त्यांना थेट..
Cockroach Janata Party protest
| Updated on: Oct 09, 2026 | 8:18 AM
Share

उद्या दिल्लीत होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील सीजेपीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील सीजेपीचे कार्यकर्ते अक्षय रामटेके यांना कुही पोलीस स्टेशनकडून नोटीस देण्यात आली आहे. उद्या कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीत मोठे आंदोलन आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन आहे. मोठ्या संख्येने तरूण दिल्लीत समजण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर या नोटीस पाठवण्यात आल्यात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठीही काही दिवसांपूर्वी कॉकरोच जनता पार्टी दिल्लीतीत जंतर मंतरवर आंदोलन पुकारले. ज्यानंतर दिल्लीत तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सरकारवर प्रचंड दबाव वाढला.

अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी मोठा मोर्चा काढला. त्यातच आता कॉकरोच जनता पार्टीही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. त्यापूर्वीच सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस दिल्या जात आहेत.

10 ऑक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होऊ नये असे नोटीसीत नमूद स्पष्टपणे करण्यात आले आहे. आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तिथे हिंसाचार, रस्ता रोको, शासकीय कामात अडथळा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पोलीस नोटीसीत नमूद केले आहे.

नोटीसीनंतरही दिल्लीतील आंदोलनाला गेल्यास तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार धरून BNNS कलम 126,135 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये स्पष्ट सांगण्यात आले. नागपूर शहरातील सीजेपीचे कार्यकर्ते भारत बानाईत यांनाही अजनी पोलीस ठाण्याची नोटीस बजावली आहे.

दिल्लीतील आंदोलनात कधी जाणार?,सोबत कोण येणार? तसेच इतर माहिती पोलिसांना देण्यात यावी, असेही सांगण्यात आलंय. पोलिसांनी विचारलेली माहिती न देता आंदोलनासाठी गेल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले. आता यावर कॉकरोच जनता पार्टी नक्की काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच