AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik News : सिग्नलवर नियम मोडाल तर सावधान, बेशिस्त वाहनचालकांवर ‘असा’ ठेवणार वॉच

वाहनचालकांकडून सतत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येते. यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी स्पेशल वॉच ठेवला आहे.

Nashik News : सिग्नलवर नियम मोडाल तर सावधान, बेशिस्त वाहनचालकांवर 'असा' ठेवणार वॉच
नाशिकमध्ये सीसीटीव्हीद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांचा वॉचImage Credit source: tv9
| Updated on: Aug 14, 2023 | 3:27 PM
Share

चैतन्या गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक / 14 ऑगस्ट 2023 : सिग्नलवर नियम मोडणाऱ्या बेशिस्ट वाहन चालकांवर आता नाशिक पोलिसांचा स्पेशल वॉच असणार आहे. नाशिक शहरातील सिग्नलवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यातून वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. कमांड आणि कंट्रोल रूममधून बेशिस्त वाहनचालकांना सूचना देण्यात येत आहे. नियम मोडणाऱ्यांना थेट सिग्नलवर लावलेल्या माईकमधून पोलीस सूचना देत आहेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात ट्रॅफिक कंट्रोल रूम सुरू झाली असून, शहरातील 40 सिग्नलवरील सीसीटिव्ही फुटेज तिथे दिसते. ‘ट्रीपल सीट वाहन चालवू नका’, ‘हेल्मेट वापरा’, ‘विरुद्ध दिशेने येऊ नका’ अशा प्रकारच्या सूचना पोलीस माईकमधून देत आहेत. येत्या काही दिवसांत सीसीटिव्हीद्वारे ई-चलन कारवाई देखील सुरू होणार आहे.

बेशिस्त वाहनचालकांवर बसणार वचक

सिग्नलवरील सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट दिसावे यासाठी पोलीस आयुक्तालयातील कमांड कंट्रोल रुममध्ये 6 बाय 4 फूटाची एलसीडी लावण्यात आली आहे. तेथे पाहून पोलीस बेशिस्त वाहन चालकांना सूचना देत आहेत. पोलिसांकडून थेट नाव पुकारण्यात येत असलेल्या वाहन चालकांवर वचक बसत आहे आणि चालक शिस्तीत वाहन चालवत आहेत.

स्मार्च सिटी अंतर्गत 800 कॅमेरे बसवले

नाशिकमध्ये स्मार्टसिटी अंतर्गत 800 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यापैकी 526 कॅमेरे पोलिसांसाठी असून, या कॅमेऱ्यांद्वारे पोलीस वाहनचालकांवर नजर ठेवत आहेत. यासाठी महिला अंमलदारांना स्मार्ट सिटी आणि आयुक्तालयाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. नाशिकमधील कुंभमेळ्यादरम्यान नजर ठेवण्यासाठी या सीसीटीव्हीचा वापर करण्यात येणार आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेशिस्ट वाहनचालक वचक बसण्यास मदत होत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.