AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणे शहराची लोकसंख्या ७० लाख, वाहनांची नोंदणी किती, वाचून बसेल धक्का

Pune News : पुणे हे देशातील सर्वाधिक वाहने असणारे शहर आहे. यामुळे पुणे शहराचे प्रदूषणाची पातळी अधिक झाली आहे. आता पुण्यात मेट्रो सुरु झाल्यामुळे स्वत:चे वाहन वापरणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे का? हा प्रश्न चर्चिला जात आहे.

Pune News : पुणे शहराची लोकसंख्या ७० लाख, वाहनांची नोंदणी किती, वाचून बसेल धक्का
pune traffic
| Updated on: Aug 14, 2023 | 1:51 PM
Share

पुणे | 14 ऑगस्ट 2023 : पुणे शहराचा चौफेर विस्तार झाला आहे. यावेळी पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत नसल्यामुळे वैयक्तीक वाहने वापरण्यावर पुणेकर भर देतात. यामुळे देशात पुणे शहरात वाहने मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे शहरात वाहनांची नोंदणी किती आहे आणि लोकसंख्या किती आहे, याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रत्येक पुणेकर किती वाहने वापरत असणार? हे ही लक्षात येते. मेट्रोच्या विस्तारामुळे पुणे शहरातील रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार का? हा एक प्रश्न आहे.

पुण्यातील प्रदूषण गंभीर

पुणे शहरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे आता पेट्रोल, डिझेलऐवजी ई-वाहनांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. पुणे महापालिकेतर्फे त्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी पुण्यात ई-रिक्षासाठी अनुदान वाटपचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे यांनी पुणे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्याचे म्हटले गेले.

किती वाहने आहेत पुण्यात

पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले की, पुणे शहराची लोकसंख्या ७० लाखांपर्यंत पोचली आहे. परंतु पुणे शहरातील वाहनांची नोंदणी ५५ लाख झाली आहे. तसेच पुणे शहरात नोंदणी न झालेली अनेक वाहनेही आहेत. त्यामुळे पुणे शहरातील वाहनांची संख्या लोकसंख्येच्या बरोबरीने जाऊ शकते. यामुळे प्रत्येक पुणेकर दोन वाहने वापरत असल्याते दिसून येत आहे.

मेट्रोची प्रवासी संख्या वाढणार

पुणे मेट्रोचे दोन टप्पे सुरु आहे. आता मेट्रोचा तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु आहे. तिसरा टप्पा सुरु झाल्यावर पुणे शहरातील प्रवाशांची संख्या चार लाखांवर जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच पुणेकरांना मेट्रो स्टेशनपर्यंत पोचण्यासाठी ई-रिक्षा, सीएनजी रिक्षाचा वापर वाढवावा लागणार आहे. त्यानंतर पुणे शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.