‘नेत्यांच्या घरी पोलीस पाठवणार’, मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार विषय, ‘या’ मंत्र्याने दिली महत्वाची माहिती
शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीवरून ठाकरे गटात खदखद निर्माण झालीय. मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटलाच प्राधान्य दिले तर, निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली अशी चर्चा आहे. त्यांनी इतकं हिंदुत्व विरोधात काम केल्यावर आम्हाला त्यांचं पक्ष वाढत राहावा असं थोडं वाटतं.
वर्धा : 17 ऑक्टोबर 2023 | मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र बसून यावर विचार केला आहे. संविधानाच्या चौकटीत मराठा बांधवाना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. या आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर आहे. लोकसभेच्या ४८ जागा या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप या एकत्रित लढणार आहे. कोणत्याही गटाची काहीही भूमिका राहणार नाही. सर्व गट हे पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच राहणार आहेत. असे राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
आमच्यात एक सूर आहे
देशाला असा प्रधानमंत्री लाभला आहे की तो सतत देशाची सेवा करत आहे. ब्रिटनचा पंतप्रधान टोनी ब्लेहर म्हणतो की ‘वन सन, वन मुन, वन अर्थ आणि वन लीडर.’ जपानमध्ये गेलो तेव्हा हिरोशिमा येथे मलाही अभिमान वाटला. जगातल्या कुठल्याही महापुरुषाचे स्टॅचू तिथे नाही. पण, पंतप्रधान मोदी यांनी प्रयत्न करून महात्मा गांधी यांचा स्टॅचू उभारला. अशा प्रधानमंत्र्यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी शिंदेचे किती खासदार, भाजपचे किती खासदार आणि अजित दादाचे किती खासदार यामध्ये कोणी कितीही आड येण्याचा विचार केला तरी आमच्यात एक सूर आहे असे त्यांनी सांगितले.
2024 मध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवू
महाविकास आघाडी सरकार गेल्यावर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी संपर्क केला होता असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला. यावर मी काही बोलू इच्छित नाही, यावर उद्धव ठाकरे अधिक जास्त सांगू शकतील. कुणी संपर्क केला. किती मिनिटांचं बोलणं झालं. बीएसएनएलच्या फोनवरून केला की मोबाइलवरून केला हे मला माहित नाही. मोदी पंतप्रधान होऊ नये असं चीनला वाटतं, आतंकवादी पाकिस्तानला वाटतं, भारताच्या विकासाची इर्षा करणाऱ्यांनाही मोदी प्रधानमंत्री होऊ नये असं वाटतं. चिनी लोकांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा काम आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात करू असे ते म्हणाले.
माहिती तपासली पाहिजे
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला हिंसक वळण लावण्याचा सरकारचा डाव होता. मात्र, मराठा समाज शांत राहिल्याने सरकारचा डाव फसला असा गंभीर आरोप केला. यावर बोलताना ते म्हणाले, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी विनायक राऊत यांच्याकडे असलेली माहिती तपासली पाहिजे. ते जर पोलीस स्टेशनला येत नसेल तर पोलिसांनी त्यांच्या घरी जावं. माहिती पूर्ण घेऊन त्यांच्याकडे असणारे तथ्य, तपशील, पुरावे तपासले पाहिजे. दुर्दैवाने पोलीस विभागाने याकडे दुर्लक्ष केले.
पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सर्व मुद्दे मी मांडणार आहे. एखादा नेता शपथ घेतो आणि त्यावेळेस तो सांगतो की मी कोणतीही माहिती लपवून ठेवणार नाही. म्हणून पुढल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडणार आहे. कोणताही नेता असो त्याने अशा पद्धतीचे आरोप केले तर त्याच्या घरी पोलिसांना पाठवून या माहितीचा तपशील जाणून घेतलाच पाहिजे अशी मागणी मंत्रिमंडळात करणार आहे. या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कुणीही उठसूट आरू करतो. त्यामुळे हा विषय मंत्रीमंडळासमोर आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं.