मॉडेलिंग ते पंकजा-प्रीतम मुंडेंशी संपर्क, पूजा चव्हाणची संजय राठोडांशी कथित जवळीक कशी वाढली?

बंजारा समाजाच्या तरुणींमध्ये तिचे मोठे फॅन-फॉलोइंग होते. मात्र, आता यापुढेही जाऊन पूजा चव्हाण हिच्या रंजक राजकीय कनेक्शनची माहिती समोर आली आहे. | Maharashtra Pooja Chavan Suicide Case

मॉडेलिंग ते पंकजा-प्रीतम मुंडेंशी संपर्क, पूजा चव्हाणची संजय राठोडांशी कथित जवळीक कशी वाढली?
पूजा चव्हाण हा परळीतील एक नामवंत चेहरा होता. सुरुवातीला पूजाला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र, नंतरच्या काळात तिने राजकारणाची वाट धरली.

बीड: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरुन (Pooja Chavan suicide) राज्यातील वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. भाजपच्या नेत्यांनी कालपासून हे प्रकरण लावून धरले आहे. तर दुसऱ्या बाजूला आता या प्रकरणातील रंजक आणि नाट्यमय घडामोडी समोर येताना दिसत आहेत. (Pooja Chavan suicide case in Maharashtra)

आतापर्यंत पूजा चव्हाण ही टिकटॉक स्टार आणि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. बंजारा समाजाच्या तरुणींमध्ये तिचे मोठे फॅन-फॉलोइंग होते. मात्र, आता यापुढेही जाऊन पूजा चव्हाण हिच्या रंजक राजकीय कनेक्शनची माहिती समोर आली आहे.

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेच्या नेतृत्त्वाखाली भाजपमध्ये प्रवेश

पूजा चव्हाण हा परळीतील एक नामवंत चेहरा होता. सुरुवातीला पूजाला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र, नंतरच्या काळात तिने राजकारणाची वाट धरली. पूजा चव्हाण हिचे शिक्षण परळीतच पूर्ण झाले होते. मॉडेलिंग करत असताना पूजा पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या संपर्कात आली होती. तेव्हा पूजाने भाजपमध्येही प्रवेश केला होता. परळीत तब्बल दोन वर्षे पूजाने भाजपची कार्यकर्ता म्हणून काम केले. मात्र, नंतरच्या काळात ती संजय राठोड यांच्या संपर्कात आली.

पूजा चव्हाणची संजय राठोडांशी कथित जवळीक कशी वाढली?

परळीत राहून भाजपमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर पूजा चव्हाण ही संजय राठोड यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. संजय राठोड हे शिवसेनेच्या विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. राठोड यांच्या संपर्कात आल्यानंतर पूजा चव्हाण हिचे कर्तृत्त्व आणखी उजळले. याच काळात ती यशाच्या अनेक पायऱ्या चढत वर गेली.

संजय राठोड यांनी पूजाच्या देखभालीची जबाबदारी अरूण राठोड या कार्यकर्त्यावर सोपविल्याचं आता पुढे येत आहे. महत्त्वाचं म्हणजे अरूण राठोड हा पूजाचा नातलग नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो पूजासोबतच राहत होता. अरूण राठोड हादेखील मूळचा बीड जिल्ह्यातील दारावती तांडा या गावचा रहिवासी आहे.

संबंधित बातम्या:

फोटो स्टोरी: एक होती पूजा! टिकटॉक स्टार ते सामाजिक कार्यकर्ती!

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

संजय राठोडांबाबत मातोश्रीची कमालीची सावध भूमिका ; भेटीची वेळ मागूनही उद्धव ठाकरेंकडून होकार नाही?

(Pooja Chavan suicide case in Maharashtra)

Published On - 4:35 pm, Sat, 13 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI