AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमित ठाकरेंसाठी शिवसेना शिंदे गटाची फिल्डिंग; सदा सरवणकरांचा पत्ता कापणार?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अमित ठाकरेंसाठी आता शिवसेना नेते ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.

मोठी बातमी! अमित ठाकरेंसाठी शिवसेना शिंदे गटाची फिल्डिंग; सदा सरवणकरांचा पत्ता कापणार?
| Updated on: Oct 26, 2024 | 3:56 PM
Share

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात महायुती असाच सामना रंगणार असल्याचं चित्र आहे. मात्रा या निवडणुकीत मनसेनं देखील उडी घेतली आहे. मनसेकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आणखी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसेनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीमध्ये अमित ठाकरे यांच्या नावाचा समावेश आहे, ते माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे याच मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे या मतदारसंघात मनसे आणि शेवसेनेमध्ये काटे की टक्कर होऊ शकते असे वाटत असतानाच मोठा ट्विस्ट आला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासाठी आता शिवसेनेचे नेते ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी आज सकाळीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी सदा सरवणकर यांची देखील भेट घेतली.

या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे, सदा सरवणकर यांना अमित ठाकरे यांच्यासाठी माघार घेण्यास शिवसेना भाग पाडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अमित ठाकरेंसाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी सुरू आहे. तर शिवसेना नेंत्याकडून सदा सरवणकर यांची मनधरणी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दीपक केसरकर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली, या भेटीनंतर त्यांनी सरवणकर यांची देखील भेट घेतली आहे.

सदा सरवणकर यांना या मतदारसंघातून माघार घेण्यास शिवसेना भाग पाडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मात्र  अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर जागेचा त्याग करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. वरळीमध्ये 2019 ला आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे यांनी उमेदवार दिला नव्हता. आताही एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेनं उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे आता शिवसेनेकडून सरवणकर यांची मनधरणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सदा सरवणकर गेली अनेक वर्ष माहिम विधानसभेचे आमदार आहेत. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्यासाठी ते माघार घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Follow Us
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ.
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?.
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती.
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.