kalyan News : कल्याणमध्ये आज वीजपुरवठा खंडीत, जाणून घ्या कोणत्या भागात जाणार किती वेळ लाईट

कल्याणमध्ये (kalyan) आज अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडीत (Power outage) करण्यात येणार असल्याची महावितरणकडून (MSEDCL) देण्यात आली आहे.

kalyan News : कल्याणमध्ये आज वीजपुरवठा खंडीत, जाणून घ्या कोणत्या भागात जाणार किती वेळ लाईट
कल्याणमध्ये आज वीजपुरवठा खंडीतImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 7:59 AM

कल्याण – कल्याणमध्ये (kalyan) आज अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा खंडीत (Power outage) करण्यात येणार असल्याची महावितरणकडून (MSEDCL) देण्यात आली आहे. आज कल्याणमध्ये महावितरणकडून 100/22 किव्ही मोहने उच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या 22 केव्ही मोहने व मोहने 12 तसेच 25 केव्ही बारावे उपकेंद्रातू निघणाऱ्या 12 केव्ही कॉलेज रोज वीज वाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे कामे करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत ही कामे करण्यात येणार असून लाईटचा खोळंबा होणार आहे.

या परिसरातली जाणार लाईट

कल्याणमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत या भागातली लाईट जाणार आहे. त्यामध्ये अटाळी, वडवली, अंबिवली, मांडा. मोहनेगाव, गाळेगाव, जेतवन नगर, फुलेनगर, यादवनगर, सहकारनगर, बाजारपेठ, आर.एस.टेकडी, एन. आरसी कॉलनी, धम्मदीपनगर बिर्ला कॉलेज रोड, संदीप हॉटेल परिसर, भोईवाडी, आर. टी. ओ, मिलिंद नगर, केडीएमसी बी वार्ड ऑफिस परिसर, कोकणरत्न हॉटेल परिसर, गगनगिरी सोसायटी परिसर या भागात आज वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे अशी माहिती महावितरण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.

दुरूस्ती काम झाल्यानंतर वीज पुरवठा सुरू होणार आहे 

कल्याणमध्ये अनेकांचे उद्योग पुर्णपणे वीजेवरती अवलंबून आहेत. आज दिवसभरात लाईट गायब झाल्यानंतर त्यांना कामे करता येणार नाहीत. त्यांना वीज पुरवठा खंडीत होणार याची आगोदर माहिती मिळावी यासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत होणार असल्याचे पत्रक काढण्यात आले आहे. कल्याणमध्ये छोटे उद्योग, कारखाने पुर्णपणे वीजेवरती चालतात. त्यांना आज फटका बसेल.

देशद्रोही सोमय्यांना जोडे मारा ! सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांवरती जोरदार टीका

08 April 2022 Panchang | 08 एप्रिल 2022, शुक्रवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

IPL 2022, Orange Cap : बटलरला धोका, ऑरेंज कॅपमध्ये डिकॉकची आगेकुच, पर्पलच्या यादीत उमेश ‘राज’ कायम

Non Stop LIVE Update
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.