AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद बनसोडे मृत्यू प्रकरण : गृहमंत्र्यांसह नितीन राऊतांचा दबाव, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीने प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद बनसोडे मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत (Prakash Ambedkar on Arvind Bansode death ).

अरविंद बनसोडे मृत्यू प्रकरण : गृहमंत्र्यांसह नितीन राऊतांचा दबाव, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
| Updated on: Jun 18, 2020 | 5:07 PM
Share

नागपूर : वंचित बहुजन आघाडीने प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद बनसोडे मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत (Prakash Ambedkar on Arvind Bansode death ). राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमूख अरविंद बनसोडे यांच्या कुटुंबावर दबाव आणत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच या प्रकरणाचा योग्य पद्धतीनं तपास झाला नसल्याचंही म्हटलं. यावेळी त्यांनी या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचीही मागणी केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आज अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची नागपूर न्यायालय परिसरात भेट घेतली. कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी त्यांच्या घरी जात होतो. त्याचवेळी आज आरोपींना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे हे समजल्यामुळे कुटुंबियांना कोर्ट परिसरात भेटलो. यावेळी अरविंदच्या वकिलांशीही सविस्तर बोलणं झालं. आम्ही अरविंद बनसोड परिवाराच्या या न्यायालयीन लढाईत सोबत आहोत.”

पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास सीबीआयकडे द्यावा

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद बनसोडे मृत्यूप्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. तसेच हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “अरविंद बनसोड याची हत्या झाली आहे. पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्यात यावे. नागपूर, थडीपवनी येथे अरविंद बनसोड याची हत्या करण्यात आली होती. 27 मे रोजी झालेल्या या हत्याप्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावापोटी आत्महत्येचा गुन्हा दाखल करुन घेतला. कारण आरोपी मिथिलेश उमरकरचा गृहमंत्र्यांशी संबंध आहे. म्हणून हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा आरोप बनसोड यांच्या नातेवाईकांनी केला आहे.”

“घटना घडली त्यावेळेस मयत अरविंद बनसोड याचा मित्र गजानन राऊत हा घटनास्थळी उपस्थित होता. त्याच्या समोर आरोपींनी बनसोड याला जबर मारहाण केली. नंतर त्यांनीच बनसोडेला कीटकनाशक पाजले. प्रकरण हाताबाहेर गेल्याचे समजताच आरोपींनी कोणालाही न विचारता, बनसोडला स्वतःच्या गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये नेले. त्यापूर्वीच बनसोडचा मृत्यू झाला होता, अशी माहिती राऊत याने पोलिसांना दिली. मात्र, पोलीस याबाबत कायदेशीर कारवाई करायला तयार नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावं”, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

संबंधित बातम्या :

अरविंद बनसोडे मृत्यूप्रकरणात हालचाली, मृत्यूप्रकरणातील तपास अधिकारी बदलला

Breaking News | ‘अरविंद बनसोडेची आत्महत्या नव्हे हत्या’- प्रकाश आंबेडकर

संबंधित व्हिडीओ :

Prakash Ambedkar on Arvind Bansode death

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.