परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणलं, मग स्थलांतरित कामगारांकडून पैसे का? : प्रकाश आंबेडकर

स्थलांतरित कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेण्याच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे (Prakash Ambedkar on Ticket Charges from migrant labours).

परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणलं, मग स्थलांतरित कामगारांकडून पैसे का? : प्रकाश आंबेडकर

मुंबई : स्थलांतरित कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेण्याच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे (Prakash Ambedkar on Ticket Charges from migrant labours). परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणलं, मग स्थलांतरित कामगारांकडून पैसे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारलाआहे. त्यांनी गावी जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांकडून रेल्वे किंवा बसच्या तिकिटाचे पैसे आकारु नये, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही स्थलांतरित कामगारांबाबत भेदभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “केंद्र सरकार असो की राज्य सरकार दोघांनीही स्थलांतरित कामगारांशी भेदभाव करायचं असं ठरवलं आहे. विदेशात अडकलेल्या भारतीयांना विमानातून घेऊन आले. त्यांना घेऊन येताना त्यांना कुठल्याही प्रकारचं तिकिट आकारलं नाही, भाडं भरायला लावलं नाही. मात्र, आता स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी नेताना रेल्वे किंवा बससाठी तिकिट लावलं जातं आहे. हा सरकारकडून सुरु असलेला भेदभाव आहे असं मला वाटतं. सरकारने तातडीने हा निर्णय बदलवावा. जसं विमानातून घेऊन येणाऱ्यांकडून कोणतंही भाडं घेतलं नाही, त्यांना मोफत घेऊन आलात तसंच गावी जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांकडून रेल्वे किंवा बसचं तिकिट मागू नये, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.”


दरम्यान, स्थलांतरित कामगारांकडून घेतल्या जाणाऱ्या पैशांच्या मुद्द्यावर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारकडे मजुरांकडून तिकिटाचे पैसे न घेण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले होते, “परराज्यातील मजूर व कामगारांना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर घरी जायला मिळते आहे. कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारु नये.”


राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील याच मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, “पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात गेलेल्या मजूरांकडून रेल्वे तिकिटाचे पैसे वसूल करणे म्हणजे गरिबांची घोर चेष्टा आहे. दिवस कसा भागवायचा याची भ्रांत असताना त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे घ्यायचे हा कोणता न्याय? केंद्र सरकारने या मजूरांना आपापल्या राज्यात मोफत सोडण्याची व्यवस्था करावी.”

संबंधित बातम्या :

परराज्यातून घरी जाणाऱ्या मजुरांकडून तिकिटांच्या पैशाची वसुली ही गरिबांची घोर चेष्टा : रोहित पवार

परराज्यातील मजूर, कामगारांकडून मानवतेच्या दृष्टीने रेल्वे तिकीट आकारु नये, मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

Prakash Ambedkar on Ticket Charges from migrant labours

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *