AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : कुंभमेळयात 10 भाविक ठार… 10 हजार कोटी कुठे खर्च झाले? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा?; संजय राऊत यांचा सवाल

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 17 भाविकांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी सरकारवर लाखो श्रद्धाळूंच्या सुरक्षेपेक्षा मार्केटिंगवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आरोप केला आहे. त्यांनी कुंभ मेळ्यासाठी वाटप केलेल्या १० हजार कोटी रुपयांच्या निधीचा वापर कुठे झाला याबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Sanjay Raut : कुंभमेळयात 10 भाविक ठार... 10 हजार कोटी कुठे खर्च झाले? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा?; संजय राऊत यांचा सवाल
कुंभमेल्यातील चेंगराचेंगरीवरून राऊत भडकले
| Updated on: Jan 29, 2025 | 10:53 AM
Share

प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी होऊन 17 भाविकांचा मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. मौनी अमावस्येच्या दिवशी शाही स्नान करण्यासाठी गंगा किनारी प्रचंड गर्दी झाली, त्यातच चेंगराचेंगरी होऊन 17 भविकांना जीव गमवावा लागला. तर अनेक भाविक जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे असून भाविकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मात्र आता याच मुद्यावरून उत्तर प्रदेश सरकारवरही टीका होत असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही योगी आदित्यनाथांसह सरकारला खडेबोल सुनावले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा लाखो श्रद्धाळूंच्या सुरक्षेवर लक्ष देणं गरजेचं आहे असे टीकास्त्र राऊतांनी सोडलं. कुंभमेळ्यासाठी 10 हजार कोटींपेक्षा जास्ट बजेट देण्यात आलं, पण ते प्रत्यक्षात दिसत नाहीत. कुंभमेळ्यातील 10 हजार कोटी कुठे खर्च झाले?. कुठे गेले पैसे?. योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असते तर एवढा मोठा अपघात झाला नसता. यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल केला पाहिजे? असा सवाल राऊतांनी विचारला. यासाठी मुलुंडच्या पोपटलालने प्रयागराजला जायला पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

कुंभमेळा हा मार्केटिंगचा विषय नाही

प्रयागराजला महाकुंभाचा सोहळा सुरू आहे. त्यात कोट्यवधी लोक कसे येत आहेत. त्या लोकांची आम्ही कशी व्यवस्था केली आहे, अशा प्रकारचं मार्केटिंग… राजकीय मार्केटिंग गेल्या काही काळापासून भाजप आणि उत्तर प्रदेश सरकार करत होतं. त्यात चुकीचं काही नाही. पण कुंभ हा मार्केटिंगचा विषय नाही, असे राऊत म्हणाले. ज्यांची श्रद्धा आहे, ते लोक कुंभला जातात. कोट्यवधी लोक आल्याचे आकडे दाखवले जात आहे. सामान्य माणसांना 10 ते 15 किलोमीटर चालत जावं लागतय. तिथल्या व्यवस्थेवर जनता खूश नाही. आज दुर्देवाने चेंगराचेंगरी झाली. माणसं तुडवली गेली. 10 पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. शेकडो जखमी आहेत. स्वत: गृहमंत्री येऊन स्नान करून गेले. घाट बंद केला. त्यावेळी लोकांची अव्यवस्था झाली. संरक्षण मंत्री आल्यावरही अव्यवस्था झाली. जेव्हा जेव्हा व्हीआयपी येतात तेव्हा त्याचा हा परिणाम असतो. लोक बाहेर तुंबलेले असतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी मार्केटिंगवर लक्ष देण्यापेक्षा लाखो श्रद्धाळूंच्या सुरक्षेवर लक्ष देणं गरजेचं आहे, असा टोमणा राऊत यांनी मारला.

त्याने प्राण वापस येणार आहेत का ?

आज 10 पेक्षा अधिक लोक ठार झाले. बैठका सुरू झाल्या, पंतप्रधान लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहे. गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय आहे? त्याने प्राण वापस येणार आहेत का? असा खडा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. लोक रस्त्यावर झोपले आहेत. अनेक महिला खुल्या रस्त्यावर झोपून आहे. 1954 रोजी जो कुंभ झाला त्याची व्यवस्था पाहा. त्यावेळी नेहरूंनी स्वत: दौरा करून कुंभची पाहणी केली. तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत हे पूर्णकाळ उपस्थित होते. त्यांनी त्याचं राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभ आयोजित केला नव्हता. धर्मशास्त्र म्हणून व्यवस्था केली. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना कुंभमेळ्याची व्यवस्था सर्वोत्तम होती असं लोक सांगतात. या व्यवस्थापनात इतर लोकांना सामावून घेतलं असतं तर ही वेळ आली नसती, पण श्रेयवाद होता. आम्हीच हिंदुत्ववादी. आम्हीच करू शकतो. यासाठी हे सुरू होतं. या सर्वांना सर्वच जबाबदार आहेत असा आरोप राऊतांनी केला.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा ?

10 हजार कोटीपेक्षा जास्त बजेट यासाठी देण्यात आलं. तिथे खर्च करण्यात आला. 10 हजार कोटी तिथे प्रत्यक्षात दिसत नाही. कोव्हिड काळात मुंबईत कोव्हिड सेंटर, खिचडी वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मग कुंभमेळ्यातील 10 हजार कोटी कुठे खर्च झाले. कुठे गेले पैसे. योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असते तर एवढा मोठा अपघात झाला नसता. यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल केला पाहिजे? यासाठी मुलुंडच्या पोपटलालने जायला पाहिजे प्रयागराजला. १० हजार कोटी कुठे गेले? कोणत्या गंगेच्या प्रवाहात गेले? लोकं का मरण पावली असे प्रश्न या पोपटलालने विचारले पाहिजे. हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा, याचं उत्तर द्या ना, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप, योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड