AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक महापालिका क्षेत्रातील जमीन नकाशे तयार; मालकी हक्क निश्चितीसाठी चौकशी सुरू, पुरावे सादर करण्याचे आवाहन

नाशिका महापालिका क्षेत्रातील जमीन मिळकतीचे नकाशे तयार करण्यात आले असून, मालकी हक्क निश्चितीसाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रातील जमीन नकाशे तयार; मालकी हक्क निश्चितीसाठी चौकशी सुरू, पुरावे सादर करण्याचे आवाहन
नाशिक महापालिका.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Oct 30, 2021 | 6:18 PM
Share

नाशिकः नाशिका महापालिका क्षेत्रातील जमीन मिळकतीचे नकाशे तयार करण्यात आले असून, मालकी हक्क निश्चितीसाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिका विस्तारित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या मौजे नाशिक क्षेत्रातील मिळकतीचे नगर भूमापन नकाशे तयार करण्यात आले आहेत. मालकी हक्क निश्चित करणेसाठी मिळकतीचे हक्क चौकशीचे काम सुरू आहे, अशी माहिती विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श. मा.) क्रमांक 1 नाशिक किशोरचंद्र देवरे यांनी दिली आहे. नोव्हेंबर 2021 पासून मौजे नाशिक येथील सर्वे नंबर 867 व 874 मधील सर्व मिळकतीचे हक्क चौकशीचे काम करण्यात येणार आहे. त्या अुनषंगाने नोटीस ‘अ’ प्राप्त झालेले वरील नमुद सर्वे नंबरमधील मिळकत धारक, शेतजमीन मिळकत धारक, भुखंड धारक यांनी त्यांचे हक्क सिध्द करणारे पुरावे, तात्काळ विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श. मा.) क्रमांक 1 नाशिक कार्यालयात सादर करावेत. याबरोबरच आपल्या मिळकतीचा नकाशा व हक्काची नोंद अचूक झाल्याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी किशोरचंद्र देवरे यांनी केले आहे.

पाणंद रस्ते योजना राबवणार

ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचा प्रश्न आजही कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पायी जाणे देखील मुश्किल होत आहे. शिवाय काळाच्या ओघात शेती व्यवसयात प्रगती होत असतना केवळ रस्ते नसल्यामुळे बागायत क्षेत्र ही वाढत नाही. कारण वाहने येण्याचीच सोय नसते. त्यामुळे ऊसाचे फळबागाचे उत्पादन घेण्याचाही शेतकरी विचार करीत नाहीत. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेता आता राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत. याकरिता ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला.

नाशिक महानगरपालिका विस्तारित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या मिळकतीचे नगर भूमापन नकाशे तयार केले आहेत. मालकी हक्क निश्चित करणेसाठी मिळकतीचे हक्क चौकशीचे काम सुरू आहे. त्या अुनषंगाने नोटीस ‘अ’ प्राप्त झालेले वरील नमुद सर्वे नंबरमधील मिळकत धारक, शेतजमीन मिळकत धारक, भुखंड धारक यांनी त्यांचे हक्क सिध्द करणारे पुरावे, तात्काळ विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श. मा.) क्रमांक 1 नाशिक कार्यालयात सादर करावेत. – किशोरचंद्र देवरे, चौकशी अधिकारी

इतर बातम्याः

आरोग्य विभागाची उद्या लेखी परीक्षा; नाशिक विभागात 53 हजार 326 परीक्षार्थी, न्यासावर निरीक्षक ठेवणार लक्ष

गुन्हेगारांच्या नांग्या ठेचत उत्तर महाराष्ट्रात 7 कोटींचे अमली पदार्थ जप्त; वेगवेगळ्या प्रकरणांत 171 आरोपींना बेड्या

Follow Us
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा