‘मंदिरपण असावे पण त्याबरोबर शाळांचापण विकास झालाच पाहिजे’ असं म्हणताच, शिक्षकावर झाला स्वामीकडून जीवघेणा हल्ला

'मंदिरपण असावे पण त्याबरोबर शाळांचापण विकास झालाच पाहिजे' असं म्हणताच, शिक्षकावर झाला स्वामीकडून जीवघेणा हल्ला
गडहिंग्लजमधील शिक्षकावर स्वामीकडून जीवघेणा हल्ला
Image Credit source: tv9 Marathi

मनवाडमध्ये प्राथमिक शाळेत असलेले मुख्याध्यापक सुरेश हुली यांनी आपल्या संकल्पनेतून शाळेचा विकास केला आहे. त्यावरुनच त्यांची कृतिशील आणि विविध प्रयोग राबवणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र त्यांच्यावर स्वामीकडूनच हल्ला झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

महादेव कांबळे

|

May 12, 2022 | 2:54 PM

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील निलजीमधील (Nilaji, Kolhapur) आणि मनवाड शाळेतील कृतिशील शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुरेश हुली (Sure Hule) यांच्यावर शिवानंद स्वामीने हल्ला (Attack) केला आहे. गावातील शाळा आणि मंदिराच्या विकासात्मक कामाबद्दल सोशल मीडियावर चर्चा चालू असताना अगोदर शाळेचा विकास करावा की मंदिराचा विकास करावा या गोष्टीवरुन वाद होऊनच शिक्षक सुरेश हुली यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. जखमींवर गडहिंग्लजलमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मनवाडमध्ये प्राथमिक शाळेत असलेले मुख्याध्यापक सुरेश हुली यांनी आपल्या संकल्पनेतून शाळेचा विकास केला आहे. त्यावरुनच त्यांची कृतिशील आणि विविध प्रयोग राबवणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यावरुनच त्यांच्या गावातील अनेकांनी आपल्याही गावातील शाळा आणि विकासात्मक गोष्टीसाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा ग्रामस्थांनी मुख्याध्यापक हुली यांच्याकडे व्यक्त केली.

विरोध मंदिराल नाही, पण…

गावात होणाऱ्या मंदिराला मुख्याध्यापक सुरेश हुली यांचा विरोध नाही मात्र त्यांनी हे ही सांगितले की, मंदिरेपण असावी पण त्याबरोबरच शाळांचापण विकास झाला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यावरुनच वाद उखरुन काढून मुख्याध्यापक हुली यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

बापलेकावर कुदळीने हल्ला

त्यानंतर गावातील व्हाटस्अॅप ग्रुपवर टाकलेल्या संदेशावरुन झालेल्या वादातून प्राथमिक शिक्षक सुरेश भिमाप्पा हुली व त्यांचा मुलग सौरभ यांच्यावर कुदळीने हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक सुरेश हुली गंभीर जखमी झाले असून त्यांचा मुलगाही जखमी झाला आहे. याप्रकरणी शिवानंद आपय्या स्वामी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून स्वामीला अटक केली गेली आहे.

प्रबोधनात्मक विचार अंगलट

सुरेश हुली हे मनवाडमध्ये प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत.हुली यांनी मनवाडमध्ये शाळेच्या शतकमहोत्सवनिमित्त झालेला कार्यक्रम आपल्याही गावात व्हावा म्हणून ते गावातील नागरिकांबरोबर विचारविनिमय करत होते. गावात कार्यक्रम राबवण्यासाठी सुरेश हुली यांचा मुलगा सौरभने आम्ही निलजीकर हा ग्रुप त्यांनी सोशल मीडियावर काढला.प्रबोधनात्मक अशी एक पोस्ट त्या ग्रुपवर टाकण्यात आली, त्यावेळी शिवानंद.यानेही मंदिराबाबतही एक पोस्ट टाकली. त्यावरुन ग्रुपवर मतभेद झाले.

स्वामीकडूनच हल्ला

सुरेश हुली यांनी त्याबाबत शाळांविषयी आपण जागरुक झाले पाहिजे अशी आशयाची पोस्ट त्यांनी ग्रुपवर पोस्ट केली. त्यानंतर सुरेश हुली आपल्या कुत्र्याला फिरवून घरी घेऊन येत असताना, शिवानंदने त्यांच्यावर कुदळीने जोरदार हल्ला केला. यावेळी हुली यांचा मुलगा आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी तो पुढे सरसावला असताना शिवानंदने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे बाप आणि मुलगा या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. स्वामी म्हणून ओळख असणाऱ्या शिवानंदने बापलेकांना मारहाण करत असताना तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. त्यानंतर शिवानंदविरोधात पोलीस तक्रार करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल आहे. याप्रकरी पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील अधिक तपास करत आहेत.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें