माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही : पृथ्वीराज चव्हाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Prithviraj Chavan on Gold statement).

माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही : पृथ्वीराज चव्हाण
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 4:25 PM

मुंबई :माझं ट्विट नीट बघा. मी फक्त मंदिराचं सोनं (Prithviraj Chavan on Gold statement) घेण्याचा उल्लेख केला नव्हता. धार्मिक स्थळांचं सोनं घेण्याचा उल्लेख केला होता. धार्मिक स्थळ म्हणजे फक्त हिंदू धर्माची मंदिरं अशी मानसिकता निर्माण झालेली आहे. माझ्या ट्विटमध्ये मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र, विपर्यास केला गेला”, असं स्पष्टीकरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Prithviraj Chavan on Gold statement).

“देशाचा एक नागरिक म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. मला नागरिक म्हणून पंतप्रधानांना सल्ला देण्याचा अधिकार आहे. धार्मिक स्थळांकडून सोनं कर्ज रुपाने घ्यावं. त्यावर व्याज द्यावं, असा सल्ला दिला होता. धार्मिक स्थळांकडून सक्ती करुन किंवा हिसकावून घ्या, असं मी म्हटलं नव्हतं”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“भाजपने जाणूनबुजून मंदिराचं सोनं काँग्रेस पक्षाला घ्यायचं आहे, असा विपर्यास केला आहे. ते सोनं मला द्या किंवा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात द्या, असं मी म्हटलेलं नाही. मी फक्त पंतप्रधान मोदींना एक सल्ला दिला आहे. हा सल्ला त्यांनी स्वीकारावा किंवा कचरा पेटीत फेकून द्यावा. मी फक्त सल्ला देण्याचं काम केलं आहे”, असं चव्हाण यांनी सांगितलं.

“मी दिल्लीत संसदेत असताना 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्ब चाचणीनंतर जी परिस्थिती निर्माण झालेली त्यावेळी सोनं गोळा केलं होतं. अलिकडेच 2015 साली स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोल्ड मॉनिटायझिंग स्कीम म्हणून एक योजना आणली होती. अजूनही ती योजना सुरु आहे. या योजनेमार्फत साडेवीस टन सोनं गोळा झालेलं आहे. मग मी सल्ला दिला म्हणून त्यामध्ये एवढा गदारोळ करण्याचं काय कारण आहे?”, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

“माझं ट्विट स्पष्ट आहे. पण भाजपला गदारोळच करायचा आहे. एक गोष्ट चांगली झाली, आपल्या देशामध्ये हिंदू-मुस्लीम चर्चांच्या पलीकडे चर्चा होऊ लागली. हिंदू धर्मातीलच पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यात चर्चा झाली. यामध्ये एक विवेकवादी तर दुसरे रुढीवादी आहेत. अशाप्रकारची चर्चा झाली पाहिजे. हा देश पुढे कुठे जाणार आहे? ते या चर्चेतून निष्पन्न होतं”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

संबंधित बातमी :

मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, टीका नाही : पृथ्वीराज चव्हाण

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.