आमचं सरकार प्रभावी, मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही, सल्ला दिला : पृथ्वीराज चव्हाण

मी मुख्यमंत्र्यांबाबत काय बोललो ते तिथे नमूद आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ काढू नये," असेही त्यांनी सांगितले. (Prithviraj Chavan comment On CM uddhav Thackeray) 

आमचं सरकार प्रभावी, मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही, सल्ला दिला : पृथ्वीराज चव्हाण
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 3:47 PM

मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मी टीका केलेली नाही. मी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, त्याचा अर्थ मी टीका केली असं नाही. भाजपवाले आघाडीत बिघाडी दाखवण्यासाठी तसा भ्रम निर्माण करत आहेत” असं स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. कोरोनाचा सामना करताना सध्याच्या नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्याचा अभाव आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्याचं सांगण्यात येत होतं. (Prithviraj Chavan comment On CM uddhav Thackeray). त्यावर पृथ्वीराज चव्हाणांना स्पष्टीकरण दिलं.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नाही, आघाडीत विसंगती आहे असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहे. मी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, त्याचा अर्थ मी टीका केली असं नाही.”

“मी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल बोललो. प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही वेळा ग्राऊंड रिअॅलिटी माहिती नसते. त्यामुळे अधिकारी आणि मंत्री यांनी समन्वय साधून काम करावं लागतं. मात्र मुख्यमंत्री कमी पडतायेत असं मी कुठेच म्हणालेलो नाही. मी केवळ जबाबदाऱ्यांचं वाटप करता येईल असं सांगितलं होतं. त्यानुसार कामाचं वाटप करुन प्रशासकीय जबाबदारी ठरवता येईल, असं मी म्हटलं,” असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“मी जे काही वक्तव्य केलं ते रेकॉर्डवर आहे. मी मुख्यमंत्र्यांबाबत काय बोललो ते तिथे नमूद आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ काढू नये,” असेही त्यांनी सांगितले. (Prithviraj Chavan comment On CM uddhav Thackeray)

“आमचं सरकार प्रभावीपणे काम करतंय, भाजप केवळ वातावरण निर्मिती करुन आघाडीत बिघाडी असल्याचा भ्रम निर्माण करतं आहे,” अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपवर केली.

“विधानपरिषदेवेळी थोरातांनी राज्यसभेबाबतच्या चर्चेवरुन वाटाघाटी केल्या आणि दोन जागा जाहीर केल्या. त्यानंतर एक जागा मागे घेतली, प्रत्येक कार्यकर्त्याला आशा असते, कार्यकर्ता नाराज झाला म्हणून वेगळा निर्णय घेऊ असं म्हणणं चुकीचं आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?

“कोरोनाचा सामना करताना सध्याच्या नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्याचा अभाव असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली. परप्रांतीय मजुरांच्या प्रवासाचा विषय आणि मुंबईत कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती योग्यरित्या हाताळण्याची गरज चव्हाण यांनी व्यक्त केली.

पृथ्वीराज चव्हाणांनी केलेली टीका ऐकून संजय निरुपम यांनी पुन्हा ट्वीट करत पृथ्वीबाबांवर निशाणा साधला होता. “कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत की कोविड19 च्या संकटाला तोंड देण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार अपयशी ठरली आहे. या अपयशाला कोण जबाबदार आहे, हे त्यांनी सांगितले नाही. हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता” अशी तोंडभर टीका संजय निरुपम यांनी केली होती. (Prithviraj Chavan comment On CM uddhav Thackeray)

संबंधित बातम्या :

निरुपम-पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर, टीका करणाऱ्या पृथ्वीबाबांवरही निरुपमांचा निशाणा

आधी नोटा छापण्याचा, आता देवस्थानातील सोने ताब्यात घेण्याचा सल्ला, पृथ्वीराज चव्हाणांच्या केंद्राला सूचना

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.