AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांसाठीच्या प्रोटेक्शन कायद्याचा दुरुपयोग; रोहिणी खडसेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे.

महिलांसाठीच्या प्रोटेक्शन कायद्याचा दुरुपयोग; रोहिणी खडसेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
| Updated on: Jan 22, 2021 | 4:01 PM
Share

जळगाव : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना त्यांनी लेखी लिहून दिलं आहे. दरम्यान, रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताच अनेकजण धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यास पुढे आले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीदेखील धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. (Protection of Women Act should not be misused; Rohini Khadse’s support to Dhananjay Munde)

रोहिण खडसे म्हणाल्या की, महिलांना कायद्याचं जे संरक्षण देण्यात आलं आहे. त्याचा कुठेही दुरुपयोग होऊ नये. एखादी महिला एखाद्या राजकीय नेत्यावर केसेस दाखल करुन त्याची प्रतिमा मलीन करत असेल तर त्यामुळे त्याचं खूप मोठ राजकीय नुकसान होतं. त्या राजकीय नेत्याने आयुष्यात कमावलेलं नाव मलीन होऊन त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, त्याचं आयुष्य उध्वस्त होतं. त्यामुळे असे खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर राज्य सरकारने त्याची कसून चौकशी करावी, नंतरच कारवाई करावी, जेणेकरुन महिलांसाठी दिलेल्या प्रोटेक्शन कायद्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही.

धनंजय मुंडेंना दिलासा

गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा म्हणावा लागेल.

रेणू शर्मा यांची तक्रार काय होती?

पार्श्वगायनाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या आमिषाने, बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक-निर्मांत्याशी भेट घडवण्याच्या आमिषाने धनंजय मुंडे यांनी इच्छेविरुद्ध आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी केला होता. रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार धनंजय मुंडे यांच्याशी 1997 मध्ये त्यांची ओळख झाली होती. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटल्याची माहिती आहे.

बहुजन समाजातून आलेल्या धनंजयला नाहक त्रास : अजित पवार

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्याबाबत अजित पवार म्हणाले की, “याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या नेत्यांना त्रास झाला. धनंजय मुंडे यांना भयंकर त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. यापूर्वी राष्ट्रवादी युवकांची सुद्धा बदनामी केली. असे आरोप करणारे काही तथ्य समोर आले नाही”

अशा प्रकरणात घाई होते. या प्रकरणी सर्वांनी विचारा करावा. आज माझे धनंजयसोबत बोलणं झाले नाही. कोणावरही राजकीय सूडबुद्धीने कारवाई करु नये, असं अजित पवारांनी नमूद केलं.

हेही वाचा

धनंजयने संधीचं सोनं केलं, पंकजांसारख्या मंत्र्यांना हरवलं, आता नाहक बदनामी का? : अजित पवार

राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगर परिषदेत सेनेच्या नगरसेविकेस सभापतीपद; धनंजय मुंडे शब्दाला जागले

(Protection of Women Act should not be misused; Rohini Khadse’s support to Dhananjay Munde)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.