CoronaVirus: शिर्डीत खासदार लोखंडेंच्या उपस्थितीत परिक्रमा यात्रा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली?

शिर्डीत जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही साई परिक्रमा काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Public programs in Shirdi despite Corona).

CoronaVirus: शिर्डीत खासदार लोखंडेंच्या उपस्थितीत परिक्रमा यात्रा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली?
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 1:26 PM

अहमदनगर : शिर्डीत जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही साई परिक्रमा काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Public programs in Shirdi despite Corona). या साई परिक्रमामध्ये ग्रामस्थ आणि देशभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही परिक्रमा 14 किलोमीटर अंतर पार करुन द्वारकामाई मंदिरापर्यंत आल्यानंतर संपली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना आहेत. असं असतानाही संसर्गजन्य रोगाचा धोका वाढवत असा प्रकार घडला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सार्वजनिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गर्दी रोखण्यासाठी सर्वोतपरी खबरदारी घेण्यात येत आहे. असं असताना शिर्डीत साई परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं. रात्री उशिरा प्रांताधिकारी यांनी साई परिक्रमेच्या कार्यक्रमास परवानगी रद्द केल्याचं जाहीर केलं. साई परिक्रमेचे आयोजक ‘ग्रीन शिर्डी क्लिन शिर्डी’च्यावतीने देखील परिक्रमा स्थगित केल्याचं पत्र देण्यात आलं. मात्र, सकाळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि देशभरातील भाविकांनी परिक्रमा पूर्ण केली. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना या माध्यमातून केल्याचं स्थानिक भाविकांनी सांगितलं.

या साई परिक्रमा यात्रेत शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते, महंत रामगिरी महाराज, काशिकानंद महाराज, माजी विश्वस्त सचिन तांबे तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. शिवसनेचे खासदार सदाशिव लोखंडे हेही काही वेळासाठी या परिक्रमेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करुनही त्याची पर्वा न करता लोखंडे यांनी साई परिक्रमेला उपस्थिती दर्शवली. प्रसारमाध्यमांनी याकडे लक्ष वेधलं असता त्यांनी त्यानंतर तेथुन काढता पाय घेतला.

देश-विदेशातील लाखो भाविकांची शिर्डीच्या साईबाबांवर निस्सीम श्रद्धा आहे. मात्र भाविकांनी आणि खास करुन ग्रामस्थांनी कोरोना विरोधात खबरदारी घेणं गरजेच आहे. प्रशासनाच्या आदेशाचं पालन न केल्यानं आता प्रशासन यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Public programs in Shirdi despite Corona

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.