AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भिसेंच्या पत्नीचे तुम्हाला शाप लागतील…” संजय राऊतांचा संताप

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी भरलेल्या अडीच लाख रुपयांनंतरही पूर्ण रक्कम न भरल्याने मोनाली भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सरकारवर रुग्णालय आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि या घटनेला राजकीय रंगही दिला आहे.

भिसेंच्या पत्नीचे तुम्हाला शाप लागतील... संजय राऊतांचा संताप
| Updated on: Apr 04, 2025 | 4:59 PM
Share

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मोनाली भिसे यांच्या उपचारासाठी अडीच लाख भरल्यानंतरही पूर्ण 10 लाख रुपये भरत नाही, तोपर्यंत उपचार करणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर महिलेनं दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. परंतु तिचा मृत्यू झाला. आता यावरुन शिवसेना संजय राऊतांनी टीका केली.

संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर टीका झाली. यावेळी त्यांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या घटनेबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी भाष्य केले. सरकारमध्ये हिंमत असेल तर रुग्णालयावर कारवाई करा. भिसे कुटुंब ज्या डॉक्टरांची नावे घेत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“आमदार अमित गोरखे यांचे भिसे म्हणून पीए आहेत. या भिसेंची ती पत्नी आहे. विचार करा. भाजपच्या कार्यकर्त्याची पत्नी. तिच्यासाठी फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेला असं सांगितलं जातं. तरीही त्या महिलेवर ही वेळ आली. एका मातेचा करूण अंत झाला. काय करतात फडणवीस. सरकारला १०० दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसले आहेत. गोरगरीबांची कामे ही फडणवीस यांच्या लेव्हलची नाही. त्यांची लेव्हल खूप मोठी आहे. गोरगरीब मध्यमवर्गीय यांची कामे तडफडून मरतात, शेतकरी तडफडून मरतात,. योजना कागदावर आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात, पोपटपंची करत. फडणवीस यांची झेप मोठी आहे. अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठमोठे. त्यांची कामे होत आहे. त्यांची लेव्हल ती आहे. त्यामुळे फडणवीस यांना त्यांच्या लेव्हलची कामे सांगितली पाहिजे. ते छोटेमोठे काम करणार नाही. त्यांच्या पक्षाला ही सवयच नाही. त्यांची लेव्हल खूप वर गेली आहे. असे भाजपचे कार्यकर्ते तडफडून मरत आहे, बायका मुले… आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहे”, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.

तुमची मजल फक्त विरोधकांना तुरुंगात टाकण्याची

“मंत्रालयात बसून दम देणं सोपं असतं हो, हे सहन करणार नाही, ते सहन करणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात अराजक माजलं आहे. बजबजपुरी माजली आहे. हे मोदींच्या नावाने भजन करत आहे. रोज नव्या घोषणा करत आहेत. १०० दिवसांचा वेध घेणार म्हणतात. काय घेणार. तुमच्या समोर एक माता, अशा पद्धतीने त्या कुटुंबाकडे २० रुपये नाही. २० लाख रुपये सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का. ते शेत विकून ते पत्नीचा उपचार तयार करायला तयार होते. माझ्याकडे सर्व माहिती आहे. मी फडणवीस यांना सांगू शकतो. त्यांना आम्ही बोलल्यावर मिर्च्या झोंबतात. पण तुमची लेव्हल जरा खाली आणा. एवढीही वर नेऊ नका. अदानी, अंबानी आणि ठेकेदारांचा महाराष्ट्र नाही. काल ज्या माता मेल्या त्यांच्यासारख्यांचा हा महाराष्ट्र आहे. या भिसे वगैरे लोकांनी मते दिली आहेत. त्यांची तुम्हाला काळजी नाही. हा लेव्हलचा प्रश्न आहे. फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर रुग्णालयावर कारवाई करा. भिसे कुटुंब ज्या डॉक्टरांची नावे घेत आहेत, त्यांच्यावर करा कारवाई. तुमची मजल फक्त विरोधकांना तुरुंगात टाकण्याची आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी कावळा सुद्धा तुमच्याकडे पाहणार नाही आणि काव काव करणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

“माझं आव्हान आहे. त्या रुग्णालयावर कारवाई करा. ज्या बाईंचा काल मृत्यू झाला त्यांचे शाप लागतील तुम्हाला. आम्ही सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नावर बोलतो. आमची ती लेव्हल आहे. त्यांची ती लेव्हल नाही. काय चाललंय हे त्यांना अजिबात कळत नाही. भ्रष्टाचाराने किडला आहे हा महाराष्ट्र. गुन्हेगारी वााढली आहे. रस्त्यावर मुडदे पडत आहे. नागपूरला त्यांच्या घरासमोर गोळीबार झाला आणि एक माणूस मरण पावला”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.