AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guillain Barre Syndrome : मोठी बातमी! GBS चा पहिला बळी, पुण्यात तरूणाचा मृत्यू

पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम (GBS) चा प्रादुर्भाव वाढत असून, एका तरुणाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. अनेक रुग्ण आढळले आहेत, काहींची प्रकृती गंभीर आहे. GBS हा दुर्मिळ आजार असून, त्याचे लक्षणे म्हणजे अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे. पुणे महापालिका अलर्टवर आहे.

Guillain Barre Syndrome : मोठी बातमी! GBS चा पहिला बळी, पुण्यात तरूणाचा मृत्यू
गुलियन बॅरे सिंड्रोमImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jan 26, 2025 | 10:07 AM
Share

पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) थैमान सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यादरम्यान टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. याच गुलियन बॅरे सिंड्रोममुळे पुण्यातील एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील DSK विश्व मध्ये राहणाऱ्या तरुणाचा GBS ची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तो तरूण मूळचा सोलापूरचा असल्याचे समजते. मात्र या तरूणाच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ माजली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS चे बरेच रुग्ण आढळले असून त्यांची संख्याही वाढली आहे. त्याचदरम्यान गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. हा तरूण डीएसके विश्वमध्ये वास्तव्यास होता. तो मूळचा सोलापूरचा होता, पण काही काळापासून पुण्यात रहात होता. या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. GBS मुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर तो तरूण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेरही आला होता. पण त्याला परत श्वासनाचा त्रास झाल्याने त्या तरूणाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान पुण्यामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 73 वर पोहचली आहे. यामधील काहींची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे. या आजारामुळे पुणे महानगर पालिका अलर्ट मोडवर असून उपाययोजना करत आहे.

गुलियन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय ?

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. दरवर्षी १ लाख लोकांमध्ये तो एका व्यक्तीला होतो. याचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या या आजाराच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी 20 टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात, अशी माहिती समोर आली आहे.

जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे. या आजाराचे नेमके कारण काय ते सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. पण गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले. पण काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगरसारखे कार्य करते.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.