AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ‘या’ महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर, तुमच्या पालिकेत किती प्रभाग?

पुणे महापालिकेसह इतरही पालिकांना आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! 'या' महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर, तुमच्या पालिकेत किती प्रभाग?
pmc
| Updated on: Aug 22, 2025 | 10:31 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर केलं आहे. अशातच आता पुण्यासह राज्यातील महत्वाच्या महापालिकांनी आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असणार आहेत. यातील 40 प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असणार आहे. यातून एकूण 165 नगरसेवक निवडले जाणार आहेत.

41 प्रभाग असणार

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 2011 च्या जनगणनेनुसार ही प्रभागरचना जाहीर झाली आहे. यानुसार पुणे शहराची लोकसंख्या 34 लाख 81 हजार 359 इतकी आहे. याच्या आधारे ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. 165 सदस्यांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 41 प्रभाग बनवण्यात आले आहेत. यातील प्रभाग क्रमांक 38 हा 5 सदस्यीय असून उर्वरित 40 प्रभाग 4 सदस्यीय असणार आहेत.

आंबेगाव- कात्रज हा सर्वात मोठा प्रभाग

समोर आलेल्या माहितीनुसार आंबेगाव- कात्रज हा लोकसंख्येनुसार सर्वात मोठा (1,14,970) आणि अप्पर सुपर इंदिरानगर हा सर्वात लहान (75,944) प्रभाग असणार आहे. जाहीर झालेल्या प्रभागरचनेनुसार कळस- धानोरी हा पहिल्या क्रमांकाचा प्रभाग असणार आहे, तसेच महंमदवाडी- उंड्री हा शेवटटा म्हणजेच 41 नंबरचा प्रभाग असणार असणार आहे.

3 सप्टेंबरपर्यंत हरकती सादर करता येणार

जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात ज्या नागरिकांना हरकती किंवा सूचना असतील त्यांनी 22 ऑगस्ट 2025 ते 3 सप्टेंबर 2025 या कालावधील कार्यालयीन वेळेत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि निवडणूक कार्यालय, स्वा.वि.दा. सावरकर भवन या ठिकाणी लेखी स्वरुपात जमा करण्याचे आवाहन करण्यात यावे असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे.

नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार नाशिक महापालिका निवडणुकींसाठी चार सदस्य प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार 122 सदस्य संख्या कायम असणार आहे. प्रभाग रचनेत कुठलाही बदल नाही. 29 प्रभाग चार सदस्यी तर 2 प्रभाग (15 आणि 19) हे तीन सदस्य असणार आहेत. या प्रभाग रचनेवर 4 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज शहरातील 32 प्रभागांची रचना जाहीर केलीये. चार सदस्यांचा एक प्रभाग असल्यानं एकूण 128 जागांसाठी ही प्रारुप प्रभाग रचना आहे. यावर 4 सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत. त्यानंतर 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडेल. सुनावणी पार पडल्यावर पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत पालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे अंतिम प्रभाग रचना सादर करतील.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 122 जागांसाठी 31 प्रभाग असणार आहेत. 29 प्रभागात 4 सदस्य असणार आहेत. तर 2 प्रभागांमध्ये प्रत्येकी 3 सदस्य असणार आहेत.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.