AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 फूट खोल दरीत पत्त्यासारखा फेकला, एक चमत्कार झाला अन्…, 2 तास बचाव; राजगडावर थरारक घटना

राजगडावर घडलेल्या थाररक घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. तब्बल 50 फूट खोल दरीत तरुण पत्त्यासारखे फेकला गेला... पण नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला नाहीतर... नेमकं काय घडलं घ्या जाणून

50 फूट खोल दरीत पत्त्यासारखा फेकला, एक चमत्कार झाला अन्..., 2 तास बचाव; राजगडावर थरारक घटना
RAJGAD FORT
| Updated on: Jun 21, 2026 | 10:27 AM
Share

तरुणांना वेगवेगळ्या फिरायला  जायला  प्रचंड आवडतं. अनेकांना तर गड किल्ल्यांवर फिरायला प्रचंड आवडतं. पण  फिरताना स्वतःची काळजी घेणं  आपली जबाबदारी असते. पण काही वेळा नकळत अशा काही घटना घडतात, ज्या प्रचंड धक्कादायक असतात. आता देखील असंच काही झालं.  राजगडावर गेलेल्या तरुणासोबत असं काही घडलं ज्यामुळे त्याचे प्राणही गेले असते. पुण्यातील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाचा चुकीच्या वाटेने गेल्यामुळे भीषण अपघात झाला. जळगाव येथे राहणारा अविनाश श्रावण बागुल हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राजगड दर्शनासाठी आला होता.. बालेकिल्ल्याकडे जात असताना मुख्य रहदारीचा मार्ग सोडून तो चुकून दुसऱ्या पायवाटेने गेला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो सुमारे 45 ते 50 फूट खोल दरीत घसरत गेला..

दरी घसरल्यामुळे त्याचा जीव देखील गेला असता. पण अविनाश  याचं नशीब  बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला. सुदैवाने खाली असलेल्या एका मोठ्या झाडाला तो अडकल्याने त्याचा जीव वाचला. मात्र या अपघातात त्याच्या पाठीच्या मणक्याला फ्रॅक्चर झालं असून मान आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. युवक दरीत अडकल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत तब्बल दोन तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर रेस्क्यू पथकाने युवकाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्याला पोलीस प्रशासन आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आणि पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात रवाना करण्यात आलं.

या थरारक बचाव मोहिमेत तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरगे, योगेश गोपी, वैभव भोसले, दिलीप तळेकर, अनिल रेणुसे आणि विशाल पिलावरे यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच प्रतीक सावंत, रोहित खबाले या पर्यटकांनी आणि पोलीस पाटील सारिका दरडीघे यांनीही बचावकार्यात महत्त्वाची मदत केली.

राजगडावर दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र अधिकृत मार्ग सोडून धोकादायक पायवाटांचा वापर केल्यास अशा गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने पर्यटकांनी केवळ अधिकृत मार्गानेच प्रवास करावा आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन केलं आहे.

Follow Us
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?