पुण्यात रिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ, 1.50 किलोमीटरसाठी 20 रुपये मोजावे लागणार

खटुआ समितीच्या शिफारशींनुसार प्राधिकरणाने हा निर्णय घेतलाय. ही भाडेवाढ पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती हद्दीत लागू होणार आहे. यापूर्वी पहिल्या दीड किमीसाठी 18 रुपये, तर पुढील प्रत्येक किमीसाठी 12.19 रुपये दर होता.

पुण्यात रिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ, 1.50 किलोमीटरसाठी 20 रुपये मोजावे लागणार
auto rikshaw thief Malad

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या हद्दीत तीन आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या 8 नोव्हेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी 20 रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 13 रुपये भाडेदर असणार आहे. खटुआ समितीच्या शिफारशींनुसार प्राधिकरणाने हा निर्णय घेतलाय. ही भाडेवाढ पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती हद्दीत लागू होणार आहे. यापूर्वी पहिल्या दीड किमीसाठी 18 रुपये, तर पुढील प्रत्येक किमीसाठी 12.19 रुपये दर होता.

सुधारित दरावर 25 टक्के अतिरिक्त भाडे आकारणार

8 नोव्हेंबरपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत रात्री 12 ते सकाळी 5 या कालावधीत सुधारित दरावर 25 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येईल. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागात या रात्रीच्या कालावधीत 40 टक्के अतिरिक्त भाडे आकारता येईल. प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानासाठी 60 बाय 40 सेंमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा अधिक मोठ्या नगासाठी 3 रुपये इतके शुल्क लागू राहील.

ही भाडेसुधारणा 8 नोव्हेंबरपासून लागू होणार

ही भाडेसुधारणा 8 नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याने रिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटर कॅलिब्रेशन) 8 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात येतेय. मुदतीत मीटर कॅलिब्रेशन करून घेणाऱ्या रिक्षांनाच ही भाडेदरवाढ लागू होईल. मुदत समाप्तीनंतर किमान 7 दिवस आणि कमाल 40 दिवस या मर्यादेत प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन केले जाईल.

ऑटोरिक्षाधारकांकडून प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये आकारण्यात येणार

निलंबनाऐवजी तडजोड शुल्क जमा करण्यात इच्छुक ऑटोरिक्षाधारकांकडून प्रत्येक दिवसासाठी 50 रुपये आकारण्यात येईल, जे किमान 500 रुपये आणि कमाल 2 हजार रुपये मर्यादेत राहणार आहे. तसेच प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी ही माहिती दिलीय.

संबंधित बातम्या

पुण्यात मेट्रोच्या थांबलेल्या कामाबाबत आठ दिवसांत निर्णय, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे विमानतळ 14 दिवसांसाठी बंद, गैरसोय टाळण्यासाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा, मुंबईला जाण्यासाठी खर्च?

Pune, rickshaw fares will be increased from November 8 to Rs 20 per 1.50 km

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI