AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात मेट्रोच्या थांबलेल्या कामाबाबत आठ दिवसांत निर्णय, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

मेट्रोच्या गर्डरमुळे मिरवणुकीला अडचण येईल अशी तक्रार केली होती. त्यानंतर महोपौर मुरलीधर मोहोळ यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र येत्या आठ दिवसांत कामाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुण्यात मेट्रोच्या थांबलेल्या कामाबाबत आठ दिवसांत निर्णय, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 7:40 PM
Share

पुणे : गणेशोत्सवादरम्यान गणेशोत्सव मंडळांनी छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डर उंचीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तसेच मेट्रोच्या गर्डरमुळे मिरवणुकीला अडचण येईल अशी तक्रार केली होती. त्यानंतर महोपौर मुरलीधर मोहोळ यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र येत्या आठ दिवसांत कामाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मेट्रोच्या गर्डरमुळे गणेशोत्सव मिरवणुकीला अडचण

मेट्रोच्या गर्डरमुळे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप गणेश मंडळ प्रतिनिधींनी घेतला होता. यावर महापौर मोहोळ यांनी सदरील काम तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले होते. तसेच मेट्रो, गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक घेतली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार महापौर मोहोळ यांच्या पुढाकाराने महापौर निवास येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस गटनेते आबा बागुल, मेट्रोचे अतुल गाडगीळ, गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लवकरच तोडगा काढण्यात यश येणार

या विषयी माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘मेट्रोच्या कामाबाबत निर्माण झालेल्या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या सूचना, कल्पना आणि पर्याय याची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. बैठकीस मेट्रोच्या तांत्रिक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याने यावर लवकरच तोडगा काढण्यात यश येणार आहे. त्या भागातील मेट्रो कामाला गती देण्याचा प्रयत्न आहे.’

मध्यममार्ग काढण्याच्या निर्णयाला उपस्थित गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा

तसेच पुढे बोलताना ‘पुण्यातील गणेशोत्सव हा समाजभान जपणारा उत्सव म्हणून जगभर ओळखला जातो. या विषयातही समाजभान जपत याबाबत मध्यममार्ग काढण्याच्या निर्णयाला उपस्थित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत विलंब न करता येत्या आठ दिवसातच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे,’ अशी माहितीदेखील मोहोळ यांनी दिली.

इतर बातम्या :

Aryan Khan Bail | आर्यन खानचा मुक्काम कोठडीतच ! न्यायालयाने निकाल राखून ठेवला, 20 ऑक्टोबरला निर्णय

Sameer Wankhede | मोठी बातमी ! समीर वानखेडेंना मुंबई पोलिसांचं समन्स, हेरगिरीप्रकरणात चौकशी होणार

आर्यन खानचा जेलचा मुक्काम का वाढतोय? कोर्टात आज काय-काय घडलं?

(decision on halted work of Metro will be taken within eight days information given by murlidhar mohol)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.