शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांच्या मुलाचे अपहरण, महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ काढत मागितली 10 कोटींची खंडणी

अशोक पवार यांची मुलगी आम्रपाली आणि वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांच्या मुलाचे अपहरण, महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ काढत मागितली 10 कोटींची खंडणी
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 9:09 AM

Ashok Pawar Son Kidnapped : शिरुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराज यांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. ऋषीराज पवार यांचे अपहरण केल्यानंतर एका बंगल्यात एका स्त्रीला बोलावून दोघांनाही विवस्त्र करून फोटो आणि व्हिडीओ काढले. यानंतर त्याच्याकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अशोक पवार यांची मुलगी आम्रपाली आणि वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

अशोक पवार यांची मुलगी आम्रपाली आणि वकील असीम सरोदे यांनी काल रात्री उशीरा एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ॲड. असीम सरोदे म्हणाले शनिवारी (९ नोव्हेंबर) दुपारी ऋषीराज पवार हे वडिलांचा प्रचार करत होते. यावेळी प्रचारादरम्यान त्यांचा कार्यकर्ता असलेला भाऊ कोळपेने ऋषीराजला एक छोटी बैठक घ्यायची असल्याचे सांगितले. ऋषीराजने आपला कार्यकर्ता समजून भाऊ कोळपेवर विश्वास ठेवला. त्यानंतर भाऊ कोळपेने त्याला मांडवगण फराटा येथील एका गावात गेले.

आमची गाडी मांडवगण वडगावपर्यंत गेल्यानतंर पुढे चारचाकी गाडी जाणार नाही, असे भाऊ कोळपे म्हणाला. यानंतर तिथं कोळपेच्या मित्रांच्या दोन दुचाकी होत्या. यानंतर एका कच्च्या रस्त्यावरुन एका बंगल्यापर्यंत बाईक नेण्यात आल्या. त्या बंगल्यात गेल्यानंतर एका रुममध्ये नेले. यानंतर भाऊ कोळपे आणि त्यांच्या दोन मित्रांनी दरवाजा बंद केला. तिथे एक बेड होता. त्यातील दोघांनी मला त्यावर बसवले आणि माझे हात-पाय पकडले. यानंतर एकाने माझ्या शर्टाची बटणं उघडली, मी या प्रकाराला विरोध केला. पण त्यांनी मला मारहाण केली. यानंतर त्यांनी तिथं पडलेलं कापड घेऊन ते माझ्या तोंडात कोंबलं. माझा गळा दाबला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर तिथे एका महिलेला बोलवण्यात आले. तिला बेडवर झोपण्यास सांगितले आणि ऋषीराज यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सांगितले. जर प्रतिसाद दिला नाही, तर तुला मारुन टाकू, अशी धमकी मला देण्यात आली. ठार मारण्याच्या धमकीमुळे आरोपी सांगेल त्याप्रमाणे ऋषीराज यांनी फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी प्रतिसाद दिला. भाऊ कोळपेनं फोटो, व्हिडीओ काढले. या प्रकारानंतर ऋषीराज यांनी हे सर्व कोणी करायला सांगितले, अशी विचारणा केली. त्यावर त्याने आम्हाला पुण्यातील एकाने १० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे सांगितले.

यानंतर ऋषीराज यांना थोडावेळ असेच डांबून ठेवण्यात आले. यानंतर ऋषीराज यांनी अधिक पैसे देण्याचे अमिष दाखवले आणि शेजारील गावात माझे मित्र राहत असून त्यांच्याकडे पैसे ठेवलेत, असे सांगितले. यानंतर ऋषीराज त्यांना दुसऱ्या गावातील वस्तीवर घेऊन गेले. आरोपीला आपल्या बोलण्यात गुंतवून त्यांनी आपला फोन काढला आणि आपल्या कार्यकर्त्यांना मेसेज करून झालेला प्रकार सांगितला. माझ्यासोबत असलेल्या कोळपेला पकडा असे सांगितले. तेथे गावात गेल्यावर कार्यकर्त्यांनी कोळपेला पकडले. तसेच त्याचा मोबाईलही ताब्यात घेतला.

अशोक पवार यांची प्रतिक्रिया

या प्रकरणानंतर आमदार अशोक पवार यांनी एक व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली. माझा मुलगा ऋषीराज पवार यांच्यावर जो प्रसंग घडला तो अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेमुळे माझे मन बैचेन झाले आहे. निवडणुका या लोकशाही पद्धतीने लढवायला हव्यात, असं कृत्य करून आमच्या कुटुंबाला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. प्रचार करत असताना हा माझ्यावर नाही, तर कुटुंबावर घात आहे. पोलिसांनी यामागील सूत्रधार कोण, याचा शोध घ्यावा, असे आमदार अशोक पवार यांनी म्हटले.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.