AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे तिथे काय उणे? अहो चक्क झुंबर, टीव्ही, एसीला फुटले पाय… पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून एक एक वस्तू गायब; सगळेच चक्रावले

पुण्यातील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून अनेक महागडी वस्तू गायब झाल्याची घटना उघड झाली आहे. 24 तास सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत ही चोरी कशी झाली हे एक मोठे कोडे आहे. गायब झालेल्या वस्तूंमध्ये एसी, टीव्ही, झुंबर आणि इतर शोभेच्या वस्तूंचा समावेश आहे.

पुणे तिथे काय उणे? अहो चक्क झुंबर, टीव्ही, एसीला फुटले पाय... पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून एक एक वस्तू गायब; सगळेच चक्रावले
| Updated on: Aug 06, 2025 | 11:11 AM
Share

पुणे तिथे काय उणे ? ही म्हण सर्वश्रुत आहेच. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याचे किस्से अनेकांना माहीत असतीलच. पण याच पुण्यात आता अशी एक घटना घडलीये, ज्यामुळे भलेभले चक्रावले आहेत. पुण्यातील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून चक्क महागडी झुंबरं, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि अन्य विद्युत उपकरणे गायब झाली आहेत. मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेशेजारी बांधण्यात आलेल्या या बंगल्यात हा अजब प्रकार घडला आहे. निवृत्त झालेले डॉ. राजेंद्र भोसले या बंगल्यात राहत होते. त्यांनी जून महिन्याच्या अखेरीस या बंगल्याचा ताबा सोडला. विशेष म्हणजे या बंगल्यात 24 तास सीसीटीव्ही होते, सुरक्षा रक्षकांचा गराडा तसेच सतत कर्मचाऱ्यांचा पहारा होता, तरीही असणाऱ्या आयुक्तांच्या बंगल्यात साहित्य गायब कसे झाले हा खरा प्रश्न आहे. आणि आणखीनच महत्वाची गोष्ट म्हणजे याबाबत महापालिकेने प्रचंड गोपनीयता पाळली असून, गायब झालेल्या गोष्टींबाबत कुठेही तक्रार अथवा गुन्हा दाखल झालेला नाही.

नेमकं काय झालं ?

महापालिका आयुक्तांसाठी मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेशेजारी मोठा बंगला बांधण्यात आला आहे. निवृत्त डॉ. राजेंद्र भोसले हेया बंगल्यात राहत होते. मात्र जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी या बंगल्याचा ताबा सोडला. त्यानंतर -महापालिका भवन, विद्युत, सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली. मात्र तेव्हा या बंगल्यात असलेलेल चार एसी, झुंबर, पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंची चित्र तसेच अन्य चित्रे, जुन्या काळातील पितळी व कांस्य धातूचे दिवे, दोन मोठे एलईडी टीव्ही, कॉफी मेकर, वॉकीटॉकी सेट, रिमोट बेल्स, चिमणीसह सुसज्ज किचन टॉप, वॉटर प्युरिफायर असं बरंच साहित्य घरात नसल्याचं उघड झालं.

सुरक्षा असूनही साहित्य कसं झालं गायब ?

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम हे लवकरच या बंगल्यात राहण्यासाठी येणार आहेत, त्यामुळे त्यांना बंगला पूर्ववत करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्युत विभागाकडून एसी, टीव्ही, वॉटर प्युरिफायरसह अन्य महत्त्वाच्या वस्तू तातडीने घेण्यात आल्या. तर इतर वस्तूंसाठी 20 लाख रुपयांच्या निविदेची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र सीसीटीव्ही सुरक्षा, सुरक्षा रक्षकांचा गराड असूनही आयुक्तांच्या बंगल्यात साहित्य गायब कसं झालं हा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून आयुक्त राम किशोर नवल यांबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.