AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठे यश, सरकारने जीआर काढले; आंदोलन मागे घेतलं!

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मांजरी येथे सुरू असलेले आदिवासी विद्यार्थांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. तब्बल 17 दिवसांनी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

पुण्यातील उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठे यश, सरकारने जीआर काढले; आंदोलन मागे घेतलं!
Tribal Student Hunger Strike StopImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 29, 2026 | 10:05 PM
Share

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मांजरी येथे सुरू असलेले आदिवासी विद्यार्थांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. तब्बल 17 दिवसांनी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी उपोषण जरी सोडले असले तरी आंदोलन मात्र तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते या आदिवासी विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सोडले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आदिवासी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती, राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या अशी माहितीही समोर आली आहे. त्यानंतर आज रात्री उशिरा मंत्री अशोक उईके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी या विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारी जोपर्यंत लेखी आश्वासन आणि शासनादेश (जीआर) हाती मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, अशी आंदोलक विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली होती. प्रवासाचा वेळ वगळता अडीच-तीन तासांत मंत्री महोदय आणि शिष्टमंडळ पोहोचेल आणि जीआर सादर करेल, त्यानंतरच आंदोलनाच्या समाप्तीची घोषणा केली जाईल असं विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार आता उपोषण सोडवण्यात आले असून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या 17 दिवसांपासून हे उपोषण सुरू होते. आज त्यांच्या 14 प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यापैकी दोन मागण्याचे GR राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. या दोन्ही मागण्याचे जीआर घेऊन मंत्री अशोक उईके हे आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. यानुसार 12 हजार 500 जागांची पदभरती 6 महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. तसेच उर्वरित मागण्या या 3 महिन्यांमध्ये मान्य केल्या जाणार आहेत असे आश्वासन सरकारकडून या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. मात्र 3 महिन्यांमध्ये मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल असा इशाराही सरकारला देण्यात आला आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?