पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला 61 कोटींचा निधी, जिल्ह्यातून 6,113 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर

केंद्र सरकारकडून राज्याला पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी (PM Housing Scheme Rural ) 111 कोटी 89 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 61 कोटी 11 लाख रुपये हे पुणे जिल्ह्यासाठी असणार आहेत. जिह्यात सर्वाधिक निधी भोर (Bhor) तालुक्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.

पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला 61 कोटींचा निधी, जिल्ह्यातून 6,113 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर
पंतप्रधान आवास योजना

पुणे : केंद्र सरकारकडून राज्याला पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी (PM Housing Scheme Rural ) 111 कोटी 89 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 61 कोटी 11 लाख रुपये हे पुणे जिल्ह्यासाठी असणार आहेत. जिह्यात सर्वाधिक निधी भोर (Bhor) तालुक्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. भोरला 18 कोटी 75 लाख, वेल्हे  (Velhe) 16 कोटी 29 लाख, मावळ (Maval) 10 कोटी 43 लाख, रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (61 crore sanctioned to Pune district for PM housing scheme Rural)

817 गावं पीएमआरडीएमध्ये समाविष्ठ

पीएमआरडीएमध्ये (PMRDA) पुणे जिल्ह्याच्या वर्तुळाकार समाविष्ठ होणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यांतल्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहरासह मावळ तालुक्यांतल्या 189, मुळशी 144, आणि हवेली तालुक्यातल्या सर्व 108, गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच खेड 114, शिरूर 68, भोर 53, वेल्हा 52, दौंड 51 आणि पुरंदर तालुक्यातली 38 अशी एकूण 817 गावं पीएमआरडीएमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत.

भोर, वेल्हे, मुळशीतून 6828 लाभार्थ्यंचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैती 6113 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या हिश्शाच्या पहिल्या आणि अंतिम टप्प्याचे प्रत्येकी 1 लाख रुपये निधी लाभार्थ्यांसाठी मंजूर केला आहे.

काय आहे पंतप्रधान आवास योजना?

पंतप्रधान आवास योजना (PM housing scheme Rural) ही 15 जून 2015 ला सुरू करण्यात आली. या योजनेत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार झोपडपट्टीवासीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती पात्र ठरवता येणार आहेत. योजनेतअंतर्गत घरासाठी ३०० चौरसफुटांचे बांधकाम करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे दीड लाख तर राज्य सरकारचे 1 लाख असे एकूण अडीच लाख रुपये अनुदान मिळते.

संबंधित बातम्या :

पुण्यात ‘डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ची स्थापना, कौशल्यविकास कोर्सेसचं प्रशिक्षण, असा घ्या प्रवेश

पुणे महानगर नियोजन समितीत ग्रामीण भागाबाबत दुजाभाव, 817 गावांमधून केवळ 7 सदस्यांची होणार नेमणूक

पुण्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन, दहावी-बारावी-आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI