Pune accident : ताम्हिणी घाटात 200 फूट खोल दरीत कोसळली कार, तिघांचा जागीच मृत्यू; भीषण अपघातात कारचा चुराडा

वाशिम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटन करून परतीच्या वाटेवर असताना माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) कारचा अपघात झाला.

Pune accident : ताम्हिणी घाटात 200 फूट खोल दरीत कोसळली कार, तिघांचा जागीच मृत्यू; भीषण अपघातात कारचा चुराडा
अपघातात कारचा झालेला चुराडा/वाशिममधील पर्यटक तरूणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 3:28 PM

पुणे : माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा भीषण अपघात (A terrible accident) झाला आहे. अपघातग्रस्त कार तब्बल 150 ते 200 फूट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत तिन्ही प्रवासी वाशिम (Washim) जिल्ह्यातील आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी निघाले होते. पुण्याहून देवकुंडकडे जात असताना माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) कारचा अपघात झाला. 200 फूट खोल दरीत कार कोसळली. यामध्ये गाडीचा चुराडा झाला आहे. ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. यांचा जागीच मृत्यू झाला असून हे सर्वजण वाशिम जिल्ह्यातील आहेत.

कठड्याला धडकून कार कोसळली दरीत

ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रोशन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवार 20 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास झाला. वाशिमहून तळ कोकणात असलेल्या देवकुंड याठिकाणी हे पर्यटक जात होते. यावेळी हा भीषण अपघात झाला. त्यांची कार ताम्हिणी घाटात आली. एक वळणावर थांबले असता ही गाडी सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली.

हे सुद्धा वाचा

रात्री उशिरापर्यंत सुरू होते बचावकार्य

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील तसेच माणगाव पोलीस पथक तसेच साळुंखे रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकादेखील याठिकाणी बोलावण्यात आली. कारमध्ये तिघे मृत झाले होते तर चार तरूण अडकून पडले होते. त्यांना पोलीस तसेच साळुंखे रेस्क्यू टीमने बाहेर काढले. मृत आणि जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंबंधी घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास माणगाव पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.