Mumbai Pune express way accident : उभ्या असलेल्या ट्रकला धडकली स्कोडा; चौघांचा मृत्यू

पुणे-मुंबई द्रुतगती (Mumbai Pune express way) मार्गावर शनिवारी स्कोडा (Skoda) कारने उभ्या असलेल्या ट्रकला (Truck) धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक दुरूस्तीसाठी थांबला होता, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Pune express way accident : उभ्या असलेल्या ट्रकला धडकली स्कोडा; चौघांचा मृत्यू
उभ्या असलेल्या ट्रकला आदळली स्कोडाImage Credit source: HT
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 10:17 AM

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune express way) शनिवारी स्कोडा (Skoda) कारने उभ्या असलेल्या ट्रकला (Truck) धडक दिल्याने अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक दुरूस्तीसाठी थांबला होता, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पुण्याजवळील महामार्गावर गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमसमोरील किवळे पुलाजवळ दुपारी 3.45च्या सुमारास हा अपघात झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हायवे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे, की भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी सेडान कार थांबलेल्या ट्रकवर आदळली आणि चारचाकी वाहनातील सर्व चार जण ठार झाले. पीडितांचे मृतदेह जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांना अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

नुकताच झाला होता अपघात

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील देवळे पुलावर बुधवारी कार खांबावर आदळून झालेल्या अपघातात 23 ते 27 वयोगटातील चौघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. रात्रभर पार्टी करून हा ग्रुप लोणावळ्याहून पुण्याला घरी परतत असताना सकाळी 9.30च्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातांची मालिकाच

2013पासून द्रुतगती मार्गावर सुमारे 1,076 अपघात झाले आहेत, परिणामी 415 मृत्यू आणि सुमारे 490 लोक जखमी झाले आहेत. जुलै 2014मध्ये याच ठिकाणी झालेल्या मोठ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. “एक ओव्हर स्पीड कार त्याच खांबावर आदळली होती, कारण तिच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते. तो ग्रुप लोणावळ्यात एका पार्टीसाठी गेला होता,” पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) कुसगाव ते देवळे पूल दरम्यानचा रस्ता अपघात प्रवण ठिकाण म्हणून घोषित केला होता, परंतु असे अपघात रोखण्यासाठी आतापर्यंत काहीही केले गेले नाही.

आणखी वाचा :

Onion Crop : आवक घटूनही कांद्याचा वांदाच, खरिपात साधले उन्हाळी कांद्याचे गणितच बिघडले

Heat : पुणेकरांना अजून काही दिवस सहन करावा लागणार उन्हाचा चटका! हवामान विभागानं काय सांगितलं?

Pune Neelam Gorhe : ‘कोर्टाचा आदेशही धुडकावणाऱ्या आंदोलकांचा हेतू पवार कुटुंबीयांना इजा करण्याचा असावा’

Non Stop LIVE Update
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.