AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता अमित शाह पुणे दौऱ्यावर, भाजप नेत्यांचे पुणे दौरे का वाढले

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्यात विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. आता त्यांच्यानंतर काही दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता अमित शाह पुणे दौऱ्यावर, भाजप नेत्यांचे पुणे दौरे का वाढले
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 03, 2023 | 1:44 PM
Share

अभिजित पोते, पुणे | 3 ऑगस्ट 2023 : पुणे शहराकडे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर नेत्यांनीही पुणे शहराला महत्व दिले आहे. यामुळे १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता अमित शाह पुण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांचा खूप वेळ राखीव असणार आहे.

पुणे भाजप मजबूत दिली ही जबाबदारी

भाजपने मिशन २०२४ ची तयारी सुरु केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी वाटली गेली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांना दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे दिली गेली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांना दिली आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर या जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या होत्या.

आता वरिष्ठ नेत्यांचे दौरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार १ ऑगस्ट रोजी दिला गेला. त्यानिमित्ताने ते जवळपास सहा ते सात तास पुण्यात होते. यावेळी विविध विकास कामांचे त्यांनी उद्धाटन केले. पुणे मेट्रोचे बटन दाबले. घरकुल आवास योजनेचे लोकार्पण केले. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 आणि 6 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात ते साखर महासंघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. परंतु या दौऱ्यातील बराचसा वेळ अमित शाह यांनी राखीव ठेवला आहे. या दौऱ्यात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत.

काय कानमंत्र देणार

भाजपने मिशन २०२४ ची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यात भाजप आपला चांगला बेस तयार करण्याचा प्रयत्नात आहे. त्यासाठी आता अजित पवार यांनाही सोबत घेतले आहे. पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ते मोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या तिन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठी अमित शाह कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत का? यावर राजकीय चर्चा सुरु झालीय.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...