Pimpri CCTV : पती गेला, तर दीर आणि सासऱ्याने घरात CCTV बसवले, पिंपरीत नेमकं काय घडतंय?

Pimpri CCTV : पती गेला, तर दीर आणि सासऱ्याने घरात CCTV बसवले, पिंपरीत नेमकं काय घडतंय?
सांकेतिक फोटो

पतीच्या मृत्यूनंतर पीडित महिलेच्या दीर व सासरे यांनी त्यांना व त्यांच्या २९ विवाहित वर्षीय मुलीचा छळ करण्यास सुरुवात केली. पीडित महिला व जावयाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय दोघांकडून घेत पीडित महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

रणजीत जाधव

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 23, 2022 | 3:08 PM

पिंपरी – शहारात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अश्याटाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर दिर आणि सासऱ्याने विधवा(widow) सुनेवर व तीच्या मुलीवर घरात तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे(cctv camera) बसवलयाचे सामोर आले आहे.याबाबत पीडित महिलेने सांगावी पोलीस (sangavi  police) स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

झालं असं की पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. पतीच्या मृत्यूनंतर पीडित महिलेच्या दीर व सासरे यांनी त्यांना व त्यांच्या 29 विवाहित वर्षीय मुलीचा छळ करण्यास सुरुवात केली. पीडित महिला व जावयाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय दोघांकडून घेत पीडित महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ऐकतच नव्हेतर संबंधित पीडित महिलेवर नजर ठेवण्यासाठी दीर व सासरे यांनी महिलेच्या घरटं सीसीटीव्हीही कॅमेरे बसलवले. किचन की, हॉल मध्ये हे कॅमरे बसवण्यात आले असून त्याद्वारे त दोघींवर पाळत ठेवण्यात आली आहे.

प्रॉपर्टीसोडून देण्यासाठी मारहाण पीडित महिला व मुलीला तुम्ही प्रॉपर्टीवरती आयत्या ठाणं मांडून बसला असून इथून निघून जावा अशी असे म्हणत अनेकदा शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. इतकच नव्हेतर तुम्ही दोघी आमचे काहीही वाकडे करू शकत नाही. एवढंच नव्हे तर तुम्ही घराच्या बाहेर कश्या निघत नाही हे बघतो असे म्हणत धमकीही दिली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.

Tmc Vs Bjp | नेताजींना आदरांजली वाहण्यावरून बंगालमध्ये तृणमूल-भाजपचा राडा; सुरक्षारक्षकाचा हवेत गोळीबार

Video : एवढा भीषण अपघात पाहिला नसेल… रस्त्याच्या कडेच्या गार्डमध्ये घुसली कार आणि…

MPSC पूर्व परिक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप, अभाविपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें