लसीकरणाचा मेगाप्लॅन, पुण्यासह ग्रामीण भागात सलग 75 तास लसीकरण मोहीम, अजित पवारांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना पुण्यासाठीच्या लसीकरणाचा मेगाप्लॅन सांगितला. अजित पवारांनी यावेळी कोरोना लसीकरण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन, मराठवाड्यात झालेली नुकसान आणि हायवेच्या जमिनींचं संपादन याविषयी अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

लसीकरणाचा मेगाप्लॅन, पुण्यासह ग्रामीण भागात सलग 75 तास लसीकरण मोहीम, अजित पवारांची माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना पुण्यासाठीच्या लसीकरणाचा मेगाप्लॅन सांगितला. अजित पवारांनी यावेळी कोरोना लसीकरण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन, मराठवाड्यात झालेली नुकसान आणि हायवेच्या जमिनींचं संपादन याविषयी अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. पिंपरी चिंचवड प्रमाणं पुणे शहरात आणि ग्रामीण भागात आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत 75  तास लसीकरण उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 30 सप्टेंबर, 1 आणि 2 ऑक्टोबर या तीन केंद्रावर लसीकरण सुरु आहे. आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत पुण्यात येत्या काही दिवसात विधानसभा मतदारसंघनिहाय 75 तास लसीकरण केले जाईल.

आझादी का अमृतमहोत्सव 75 तास लसीकरण उपक्रम

पिंपरी चिंचवड प्रमाणं पुण्यात आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत 75 तास लसीकरण उपक्रम राबवला जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 6 तालुक्यात त्यानंतर उर्वरित तालुक्यात हा 75 तास लसीकरणाचा कार्यक्रम घेणार आहोत. पुणे शहरात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात नियोजन करुन 75 तास लसीरकरण करण्याचा आमचा मानस असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

ग्रामीण भागाला डीपीडीसीतून निधी देणार

खासदार अमोल कोल्हे खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सीएसआरमधून 5 लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत, असं अजित पवार म्हणाले. कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या एक लाख सिरींज पुणे शहरात सिरींज घेण्यात आल्या आहेत. खासगी कंपन्या निधी देणार असल्यानं आम्ही ग्रामीण भागात डीपीडीसीच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून सिरींज देणार आहोत, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात अ‌ॅक्टिव्ह रुग्ण घटले

पुणे महापालिकेत 2.1 कोरोनाबधित रेट आहे. कोरोनाची मागच्यावेळी पेक्षा परिस्थिती सुधारली आहे. पुण्यातील मृत्युदर 2.1 आला आहे. पिंपरीचा थोडासा मृत्युदर वाढला आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात मागील आठवड्यात 5 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. नागरिक दुसरा डोस घेततयानंतर नियम पाळत नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, अशा कानपिचक्या अजित पवार यांनी पुणेकरांना दिल्या आहेत. पुण्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 19 टक्के घट झाली आहे.

मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता नाही

राज्यात आता 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत.शाळांमधून कोविड प्रोटोकॉल सांगण्यात यावा. शाळा 4 तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पालक अजून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही, दिवळींनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय. हे खरं आहे पण अजून निर्णय झालेला नाही जलयुक्त शनिवार योजनेमुळेच एवढा पूर आलाय का? अशी शंका तज्ज्ञांनी उपस्थित केलीय हे खरं आहे त्याचाही अभ्यास करू, असं अजित पवार म्हणाले. नुकसान भरपाई देण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, असंही अजित पवार म्हणाले. मोठा भाग पूरग्रस्त बनलाय, पीकविमा संबंधित विमा कंपन्यांना सूचना दिल्यात आहेत. पाऊस पडत होता तेव्हा मंत्री मराठवाड्यातच होते. मंत्री फिरकले नाहीत हा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचं अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या:

आठवड्यात नुकसान भरपाईबाबत निर्णय घेणार, मदतीसाठी डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना अजितदादांचा शब्द

दोन प्रभाग कधीच मागितले नाही, तीन प्रभागांचा फायदा कुणाला होतो ते पाहू; अजित पवारांचं सूचक विधान

 

Ajijt Pawar said Azaadi Ka Amrit Mahotsav seventy five hour corona vaccination drive in Pune pmc and Rural area

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI