AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वडीलधाऱ्यांनी असं बोलल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते’, अजित पवार शरद पवारांवर कडाडले

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं. मूळ पवार आणि बाहेरचे पवार यांच्यात फरक असतो, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन अजित पवारांकडून सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. अजित पवार यांनी आजदेखील शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.

'वडीलधाऱ्यांनी असं बोलल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते', अजित पवार शरद पवारांवर कडाडले
सुनेत्रा पवार, अजित पवार आणि शरद पवार यांचा फोटो
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 17, 2024 | 8:50 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मूळ पवार आणि बाहेरचे पवार यांच्यात फरक असतो, अशा शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. “40 वर्षात सून येऊन देखील तिला परकी मानली. महिलांनी याचा विचार करायला हवा. वडीलधाऱ्या लोकांनी असं बोलल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते”, असं अजित पवार म्हणाले.” बारामतीच्या विद्यमान खासदारांचं गेल्या 10 वर्षातलं दिसेल असं एक काम सांगा. मी केलेली कामे जाहीरनाम्यात टाकली. त्यांचा जाहीरनामा पाहिल्यावर मीच केलेली कामे दिसली”, अशी टीका अजित पवारांनी केली. “माझे विचार सर्वांना पटले नसतील. पण ही लोकशाही आहे. मी कामाचा माणूस आहे”, असा दावा अजित पवारांनी केला.

“विरोधक आरोप करतात. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप मंत्री झाल्यावर होतात. कामे नाही केली तर कसे आरोप होतील? भूखंड घोटाळा, दाऊदशी कुणाचे नाव जोडले? हे आरोप कुणावर झाले? त्यात सत्य नव्हते. पण आरोप झाले ना?”, अशा शब्दांत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. “कितीही कामे केल्यावर माझ्याबरोबर राहत नाही म्हटल्यावर काय केल्यावर राहतील ते देखील करू. काहीजणांनी 50 वर्षे काम केलं. आता त्यांनी म्हंटल पाहिजे, आम्हाला काम आता करूद्या. माझ्या आता ओळखी झाल्या आहेत. मी अर्थमंत्री आहे आणि राज्याचा 6 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडत आहे”, असं अजित पवार म्हणाले. “एवढ्या वेळ म्हणतील, मत द्या. किती वेळ द्यायचं? एकदा सांगा”, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

अजित पवारांची बारामतीकरांना साद

“खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही”, असं अजित पवार म्हणाले. तसेच “मौलाना आझाद मंडळाला 1 हजार अर्थसंकल्पात तरतूद केली. आजपर्यंत कुणीही ही बाब केली नाही. बारामतीसारखं इतर तालुक्यात काम केलं तर ते मला बिनविरोध लोक निवडून देतील. बारामतीमध्ये कायदा-सुव्यवस्था सगळ्या बाबी चांगल्या आहेत. सहकार क्षेत्रातील सर्व ठिकाणी माझे बारकाईने लक्ष आहे. मला आजपर्यंत साथ दिली तशी आता भावनिक न होता साथ द्यावी”, अशी साद अजित पवारांनी बारामतीकरांना घातली.

‘काहीजण भेटायला येतील, डोळ्यांत पाणी आणतील, पण…’

“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी जास्त ओळख नव्हती. कामाला सुरुवात केली आणि मला उद्धवजी यांनी मुभा दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक गट घेऊन जाईपर्यंत मी विश्वासाने काम केलं. काहीजण भेटायला येतील. डोळ्यांत पाणी आणतील. एवढ्या वेळेस म्हणतील. पण आता माझंच ऐका एवढ्या वेळेस मी हात जोडून सांगतो”, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त