मुख्यमंत्री आदित्य ठाकरे… अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी मीडियाशी संवाद साधताना अनावधानाने आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब असा केला.

मुख्यमंत्री आदित्य ठाकरे... अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले...
ajit pawar

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी मीडियाशी संवाद साधताना अनावधानाने आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब असा केला. अजित दादांच्या या स्लीप ऑफ द टंगची दिवसभर बातमी चालल्यानंतर संध्याकाळी अजित पवार यांनी त्यावर खुलासा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्याठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. असं काहीही नाही. आमचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंच आहेत, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आणि पुण्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. राज्य सरकारने जी नियमावली केली आहे त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू केलं आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना लसीकरण केलं जातं आहे. आतापर्यंत 48 टक्के लसीकरण झालंय. जिल्ह्यात इतर जिल्ह्यासारखी परिस्थिती नाही. त 60 वर्षांच्या व्यक्तींचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असं पवार म्हणाले.

बुस्टर डोसमध्ये 9 महिन्याचं अंतर हवं

यावेळी अजित पवार यांनी बुस्टर डोसमध्ये 9 महिन्याचं अंतर असलं पाहिजे अशी मागणी केली. नागरिक नियम पाळत नाहीत म्हणून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाची चाचणी करणारे नवे किट्स मेडिकलमध्ये मिळत आहे. त्यामुळे अनेकजण ही किट्स घेऊन घरी जात असून स्वत:च कोरोनाची चाचणी करत आहेत. त्यामुळे मेडिकलमधून किट्स घेऊन जाणाऱ्यांचा नंबर मेडिकलवाल्यांनी नोंद करून घ्यावा आणि हा नंबर आम्हाला देणं बंधनकारक करण्यात येणार आहे. म्हणजे किट्स घेऊन जाणारे पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह हे तरी आम्हाला कॉल करून माहिती घेता येईल, असं त्यांनी सांगितलं.

मास्क वापरा, सरकारला सहकार्य करा

बाहेरच्या देशात मोठी लाट आलीये, मात्र मृत्यूदरात मात्र घट झाली आहे. राज्यात कोरोनामुक्ततेचं प्रमाण 95 टक्के आहे. मात्र तरीही बेड्स, जम्बो कोविड सेंटर,अण्णासाहेब मगर जम्बो हॉस्पिटल सगळी तयारी आपण करून ठेवली आहे, असं सांगतानाच मास्क नाही वापरला तर 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत 9 हजार 270 नागरिकांकडून 46 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क वापरा आणि सरकारला सहकार्य करा असं आवाहन मी सर्वांना करत आहे, असं आवाहनही त्यांनी केलं.

भीमा कोरेगावला गेल्याने पोलिसांना कोरोना

भीमा कोरेगाव आणि इतर ठिकाणी गेल्यामुळे पोलीस कोरोनाबाधित झाले होते. बाधित पोलीसांपैकी तीनच पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत. बाकीच्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

बँकेची सत्ता हाती येताच बाळासाहेबांचा फोटो उतरवला, फक्त राणेंचा फोटो लावला; शिवसेनेकडून संताप व्यक्त

आता रस्त्यांसाठी जमीन गेली तर मोबदला कमी मिळणार! कारण सांगताना अजित पवारांनी गडकरींकडे बोट दाखवलं

Ajit Pawar | अन् अजित पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, नेमकं काय घडलं?

Published On - 7:01 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI