AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दगडात 3 पक्षी | अजित पवार यांच्याकडून शिंदे, राणे आणि भाजपवर जोरदार टोलेबाजी

अजित पवारांच्या निशाण्यावर कोण कधी येईल काही सांगता येत नाही. चिंचवडच्या प्रचारसभेतून शिवसेनेच्या फुटीवरुन बोलताना अजित पवारांनी नारायण राणेंवर बोचरी टीका केलीय.

एका दगडात 3 पक्षी | अजित पवार यांच्याकडून शिंदे, राणे आणि भाजपवर जोरदार टोलेबाजी
| Updated on: Feb 24, 2023 | 11:48 PM
Share

पुणे | विधानसभा विरोधीपक्षनेता अजित पवार यांचं भाषण म्हटलं की, चिमटे आणि टोलेबाजी आलीच. चिंचवडमधल्या भाषणातून अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोले लगावलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. त्यानंतर शिंदेंनीही दादांना त्याच भाषेत उत्तर दिलंय. अजित पवारांच्या निशाण्यावर कोण कधी येईल काही सांगता येत नाही. चिंचवडच्या प्रचारसभेतून शिवसेनेच्या फुटीवरुन बोलताना अजित पवारांनी नारायण राणेंवर बोचरी टीका केलीय.

शिवसेना फोडणारे आणि शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले, हे सांगताना राणेंना तर वांद्र्यात बाईनं पाडलं, असं अजित पवार म्हणालेत.

अजित पवार ज्या वांद्रे पोटनिवडणुका उल्लेख करतायत. ती पोटनिवडणूक 2015मध्ये झाली होती .त्यात शिवसेनेनं त्यावळेचे काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंचा पराभव केला होता. तृप्ती सावंत यांना 52 हजार 711 मतं मिळाली होती तर राणेंना 33 हजार 703 मतं मिळाली. म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या तृप्ती सावंतांनी राणेंना 19 हजार मतांनी पराभूत केलं होतं.

त्यामुळंच अजित पवार बाईनं पाडलं म्हणत राणेंना डिवचतायत. एकीकडे अजित दादा राणेंवर बोलले आणि तिकडे संजय राऊतांना मोठा आनंद झाला. राऊतांनी ट्विट करत अजित दादांचं कौतुक केलं.दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज नेता असाच असतो, एकदम मोकळा ढाकळा. सहज सोप्या भाषेत थेट संदेश जय महाराष्ट्र.

अजित पवारांनी आपला मोर्चा, भाजपकडेही वळवला .महागाईवरुन भाजपवर टीका करताना, दादांनी भाजपचा उल्लेख कमळाबाई असा केला.

पुण्यात निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच MPSCच्या विद्यार्थ्यांचंही आंदोलन सुरु होतं. त्यावरुन विद्यार्थ्यांच्या मागण्याबद्दल बोलताना, शिंदेंकडून चुकून MPSC आयोगाऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख झाला. त्यावरुनही अजित पवारांनी टोलेबाजी केली.

अजित पवार म्हटलं की. त्यांचा हटके अंदाज आलाच. चिंचवडमध्येही दादांची तीच झलक दिसली. अजित पवारांच्या टीकेला नितेश राणेंनी उत्तर दिलंय. अजित दादा मोठे नेते. पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे.

राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले.. शाम सावंत सोडून. माहिती असुदे दादा. बस या वेळी माझा मित्र पार्थ याला निवडून आणा. गेल्या वेळी बिचारा एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला, म्हणून काही होत का बघा.

राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात. तुमचा आवडता, टिललू

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.