AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde on Ajit Pawar: मोठा भाऊ हरपला; अजितदादांच्या मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री भावूक, विमान अपघाताची चौकशी करणार, एकनाथ शिंदेंची घोषणा

Eknath Shinde on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली आहे. राज्यात दुखवटा जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावूक झाले. अनेकांच्या मनाला चटका लावणारी ही एक्झिट अनेकांना सहन करणे अवघड झाली आहे. यावेळी शिंदे यांनी विमान अपघाताची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.

Eknath Shinde on Ajit Pawar: मोठा भाऊ हरपला; अजितदादांच्या मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री भावूक, विमान अपघाताची चौकशी करणार, एकनाथ शिंदेंची घोषणा
अजितदादा पवार, एकनाथ शिंदेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 28, 2026 | 12:41 PM
Share

Ajit Pawar Death in Plane Crash at Baramati: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी 8:42 वाजेच्या सुमारास भीषण विमान अपघातात निधन झाले. एक रोखठोक आणि रुबाबदार नेता महाराष्ट्राने या विमान अपघातात गमावला. त्यांची ही अचानक एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांना गलबलून आले. अनेकांना अश्रू अनावर झाले. अनेकांच्या डोक्यावरील छत्र हरवल्याची भावना आहे. अनेक कार्यकर्ते हे धायमोकलून रडत आहेत. दरम्यान मोठा भाऊ हरपल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एकनाथ शिंदे हे प्रतिक्रिया देताना भावूक झाले. त्यांनी यावेळी अजितदादांसोबतच्या आठवणी जागवल्या.

स्वप्नातही विचार केला नाही

अजितदादांची ही अकाली एक्झिट अनेकांसाठी धक्कादायक ठरली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. मनाला वेदना देणारी आणि चटका लावून जाणारी ही दुर्दैवी घटना राज्यात घडली. कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की अजित पवार इतक्या लवकर आपल्यातून जातील. महाराष्ट्रासाठी दुःखद आणि दुर्दैवी घटना अजित पवार यांच्या जाण्याने झाली आहे. अजितदादा हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते. अतिशय परखड, स्पष्टवक्ते आणि प्रशासनावर त्यांची पकड होती. प्रत्येक गोष्टीत त्यांना अत्यंत सखोल अभ्यास करून बोलण्याची त्यांची सवय होती. ते परखड, स्पष्टवक्ते होते. चूक असल्यास चूक असे निर्मळ मनाचे ते व्यक्तिमत्व होते. मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम केले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना अथवा इतर योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक घडी अथवा तरतूद अतिशय उत्तमपणे त्यांनी केली. मी त्याचा अनुभव घेतला आहे. एकदा करायचं ठरवलं की ते करायचेच. करतो, पाहतो असं शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हेत. जे जमत नाही ते त्याला नाही म्हणायचे. त्यांचा स्पष्टवक्तेपणा उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

माझ्यापेक्षा ते राजकारणात अनुभवी होते. वयानेही ते मोठे होते. त्यांना अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अनेक विभाग हातळले आहेत. राज्याला त्यांच्या या अनुभवाचा फायदा झाला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबियच नाही तर महाराष्ट्राचं न भरून निघणारं नुकसान झालं आहे. आमची गेल्या अनेक वर्षांपासून जवळीक निर्माम झाली होती. एका मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे. मी त्यांना आदरांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अपघाताची चौकशी करणार

या अपघाताची चौकशी व्हायला हवी का, अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली. त्यावेळी आमचे जवळचे सहकारी या विमान अपघातात गेले आहे. या विमान अपघाताची चौकशी नक्कीच झाली पाहिजे. कारण अशा प्रकारचे अपघात होऊ नये याची काळजी, दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ही चौकशी केली जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा