अजित पवारांना फक्त स्वतःच्या मुलाची चिंता लागलीय! स्वप्नील लोणकर आत्महत्येवरून गोपीचंद पडळकरांची टीका

स्वप्निलच्या मृत्यूमुळे लोणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे स्वप्निलच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांची भेट घेतली. (Ajit Pawar is only worried about his own son, Gopichand Padalkar's criticism on Swapnil Lonakar's suicide)

अजित पवारांना फक्त स्वतःच्या मुलाची चिंता लागलीय! स्वप्नील लोणकर आत्महत्येवरून गोपीचंद पडळकरांची टीका
स्वप्नील लोणकर आत्महत्येवरून गोपीचंद पडळकरांची टीका
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 5:39 PM

दौंड : स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जोरदार टीका केली. अजित पवार यांना स्वप्निलचे काही घेणेदेणे नाही, त्यांना त्यांचा मुलगा पार्थची काळजी आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का याची चिंता अजित पवार यांना असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. (Ajit Pawar is only worried about his own son, Gopichand Padalkar’s criticism on Swapnil Lonakar’s suicide)

पडळकरांनी लोणकर कुटुंबीयांची घेतली भेट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरकारी नोकरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वप्नीलचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. स्वप्निलच्या मृत्यूमुळे लोणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे स्वप्निलच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल हेदेखील उपस्थित होते.

लोणकर कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पडळकर यांनी tv9 मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही अजित पवार यांनी अद्याप लोणकर कुटुंबियांची भेट घेतलेली नाही. अजित पवार यांना स्वप्निल लोणकरशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त स्वतःच्या मुलाचे म्हणजेच पार्थ पवारचे पडले आहे. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का, याची चिंता अजित पवार यांना आहे, असा घणाघाती टोला पडळकर यांनी यावेळी लगावला.

सरकारची अनास्थाच कारणीभूत असल्याचा आरोप

स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला सरकारची अनास्थाच कारणीभूत असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नीलच्या घरच्यांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्या, अशी मागणी विधानसभा अधिवेशनावेळी सभागृहात केली होती. अधिवेशन होऊन गेले, मात्र अजून सरकारकडून स्वप्निलच्या घरच्यांना ठोस मदत मिळालेली नाही. सरकार नुसत्या बैठका घेणार असेल तर मी या सरकारचा निषेध करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारचा प्रतिनिधी पाठवून लोणकर कुटुंबियांची भेट घेणे गरजेचे होते. मात्र अद्याप तसे घडलेले नाही, अशा शब्दांत पडळकरांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला आहे. (Ajit Pawar is only worried about his own son, Gopichand Padalkar’s criticism on Swapnil Lonakar’s suicide)

इतर बातम्या

अनलॉकनंतर मोठ्या प्रमाणात घरफोड्या, नवी मुंबईत सराईत चोरांची टोळी गजाआड

Video | “हमारा नेता कैसा हो…” म्हणताच बैलगाडी तुटली, काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप कोसळले, व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.