AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खराब हवामानाचा फटका, अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आल्याने अजित पवार यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (ajit pawar kolhapur visit postponed due to bad weather)

खराब हवामानाचा फटका, अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द
उपमुख्यमंत्री अजित पवार
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 11:14 AM
Share

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आल्याने अजित पवार यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (ajit pawar kolhapur visit postponed due to bad weather)

अजित पवार आज सकाळी 9 वाजता कोल्हापूर विमानतळावर येणार होते. त्यानंतर सव्वा नऊन वाजता ते शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देणार होते. तिथून ते शिवाजी पूल पूरग्रस्त परिसराची पाहणी करणार होते. नंतर सव्वा दहा वाजता शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्याती पूरग्रस्त परिस्थितीचा आढाव घेणार होते. त्यानंतर 11.30 वाजता ते हेलिकॉप्टरने शिरोळकडे जाणार होते. 12 वाजता शिरोळमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करणार होते. त्यानंतर सव्वा एक वाजता पलूसकडे जाऊन पलूस परिसराची पाहणी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरला जाण्याऐवजी अजित पवार सांगलीला रवाना झाले आहेत.

भिलवडी गावात दाखल

कोल्हापूरचा दौरा रद्द केल्यानंतर अजित पवार भिलवडी गावात आले आहेत. त्यांच्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम आहेत. भिलवडीतील निवारा केंद्रात जाऊन त्यांनी स्थानिकांची विचारपूस केली. तुम्ही जिथे राहता तिथे महापुराचं पाणी नेहमी येतं का? पहिल्यांदाच पाणी आलं का? पाणी आलं तर किती वर्षानंतर आलं? असे प्रश्न त्यांनी निवारा केंद्रातील लोकांना केले. तसेच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्व मदत देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिली.

खराब हवामानामुळे गेलो नाही

सकाळीच कोल्हापूरला जाणार होतो. विभागीय आयुक्त सौरभ राव यांना घेऊन कोल्हापूरला जाणार होतो. मात्र खराब हवामानामुळे मला जाता आले नाही.आज भिलवडी येथील पूरग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत आहे. सोबत पालकमंत्री आहेत. यानंतर सांगलीला जाऊन बैठक घेणार त्यानंतर पत्रकारांशी बोलणार, असं अजित पवार यांनी सांगितलं.

सांगलीला जाणार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सांगलीत अनेक ठिकाणी मोटारीने प्रवास करून पाहणी करणार आहेत. पलूस येथे पाहणी केल्यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते साताऱ्याच्या दिशेने जाणार आहेत. (ajit pawar kolhapur visit postponed due to bad weather)

संबंधित बातम्या:

भाजप नेत्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलीय, त्यांना काहीच दिसत नाही; शंभुराज देसाई यांचा हल्ला

Maharashtra Rain LIVE | सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप, जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण

Video: सीएम बीएम गेला उडत, आम्हाला नावं नका सांगू कुणाची? राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले

(ajit pawar kolhapur visit postponed due to bad weather)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.