Maharashtra Rain LIVE | राज्यातील पूर परिस्थिती सुधारल्यानंतरच लसीकरण मोहीम : राजेश टोपे

| Updated on: Jul 27, 2021 | 12:02 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती.

Maharashtra Rain LIVE | राज्यातील पूर परिस्थिती सुधारल्यानंतरच लसीकरण मोहीम : राजेश टोपे
फोटो प्रातनिधिक

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Jul 2021 05:18 PM (IST)

    राज्यातील पूर परिस्थिती सुधारल्यानंतरच लसीकरण मोहीम : राजेश टोपे

    “राज्यात सध्या पूर परीस्थिती आहे. या भागातील पूर परिस्थिती सुधारल्यानंतरच लसीकरण आणि कोरोना चाचण्या करणे शक्य होणार आहे”, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. सध्या पूरग्रस्त भागात हॉस्पिटल, दुकाने, घरे यामध्ये गाळ साचलेला आहे. ही सर्व ठिकाने स्वच्छ करून तसेच निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या असल्याचेही राजेश टोपे म्हणाले आहेत.

  • 26 Jul 2021 02:42 PM (IST)

    तळीये दुर्घटनेतील बचावकार्य वेगाने सुरु, एनडीआरएफच्या एकूण 34 तुकड्या

    बचाव कार्य वेगाने सुरू

    • एनडीआरएफच्या एकूण ३४ तुकड्या ; (पालघर १, ठाणे २, रायगड १ , रत्नागिरी ६ , सिंधुदुर्ग २ , सांगली २ , सातारा ४ . कोल्हापूर ८ ,मुंबई ३, पुणे ४, नागपूर १) • तटरक्षक दलाच्या २ तुकड्या रत्नागिरी , लष्कराच्या २ तुकड्या कोल्हापूर आणि सांगली येथे • एसडीआरएफच्या रायगड जिल्ह्यासाठी २, वर्ध्यासाठी १ अशा ३ तुकड्या • बोटी : १४२ ( १३१ एनडीआरएफ आणि ११ एसडीआरएफ)

  • 26 Jul 2021 12:55 PM (IST)

    पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल, 1028 गावे बाधित, 164 मृत्यू

    पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल

    मदत व पुनर्वसन विभागाने आज दि २६ जुलै सकाळी ११ वाजता दिलेल्या माहितीनुसार

    पूरग्रस्त भागातून सुमारे २ लाख २९ हजार ७४ लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण १६४ मृत्यू झाले असून २५,५६४ जनावरांचे मृत्यू आहेत. एकंदर ५६ लोक जखमी असून १०० लोक बेपत्ता आहेत १०२८ गावे बाधित. निवारा केंद्रे २५९, निवारा केंद्रातील लोक ७८३२,

  • 26 Jul 2021 11:41 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली धरण 100 टक्के भरलं

    नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली धरण 100 टक्के भरलं - त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबोली धरण पूर्ण क्षमतेनं भरलं - आज सकाळच्या सुमारास धरण ओव्हरफ्लो - धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग - तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरणातील पाणीसाठा 68 टक्क्यांव

  • 26 Jul 2021 11:39 AM (IST)

    मराठवाड्यात समाधानकारक पाऊस, 60 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध

    औरंगाबाद  :-

    मराठवाड्यात पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ..

    मराठवाड्यातील 11 पैकी 6 प्रकल्पांत 60 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा..

    पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याची आवक वाढण्यास होणार सुरुवात..

    मराठवाड्यात समाधानकारक पाऊस..

    चांगला पाऊस राहिल्यास मराठवाड्यातील 11 मोठे प्रकल्प भरण्याची दाट शक्यता..

    पावसाचा जोर असाच राहिल्यास जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची वाढेल आवक.

  • 26 Jul 2021 11:38 AM (IST)

    तळीये दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं असलं तरी बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करा, स्थानिकांची मागणी

    महाड - तळये दुर्घटना प्रकरण

    - रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं मात्र मिसिंग नागरिकांना मृत घोषित करा - स्थानिक नागरिकांची मुख्य मागणी - पूनर्वसनाचा प्रश्न ही सरकारने तात्काळ मार्गी लावावा - तसेच सद्य स्थितीत दैनंदिन गरजेच्या वस्तू पूरवाव्यात

  • 26 Jul 2021 11:37 AM (IST)

    मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक 5 दिवसांनी पुन्हा सुरु होणार, 8 फूट उंचीच्या वाहनांना परवानगी

    चिपळूण - मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक थोड्याच वेळात पुन्हा होणार सुरू

    बहादूर शेख येथील वाशिष्टी नदीवरील खचलेल्या पुलावर भराव टाकून पूल केला दूरस्थ

    पाच दिवसांनी पुन्हा एकदा वाहतूक होणार सुरू

    8 फूट उंचीच्या वाहनांना दिली जाणार परवानगी

  • 26 Jul 2021 09:58 AM (IST)

    तळीये दुर्घटना प्रकरण : सलग पाचव्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात

    महाड ब्रेकिंग - तळये दुर्घटना प्रकरण - सलग पाचव्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात - NDRF, SDRF, TDRF टीमच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू - आतापर्यंत 53 मृतदेह शोधण्यात बचाव पथकाना यश - तर अद्यापही 32 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती - पाऊस जास्त होत असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला येतोय अडथळा

  • 26 Jul 2021 09:24 AM (IST)

    कोल्हापूरच्या वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड

    वासनोली धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका

    निकृष्ट कामाच्या दर्जामुळे वासनोली धरण बहुचर्चित

    सांडव्याला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

  • 26 Jul 2021 08:45 AM (IST)

    नाशिकच्या दारण धरण क्षेत्रात पाण्याचा साठा वाढला, पाण्याचा विसर्ग सुरूच

    नाशिक - दारण धरण क्षेत्रात पाण्याचा साठा वाढला..

    धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच..

    धरणातून पाण्याचा विसर्ग 1215 क्यूसेस ने आणखी वाढवला..

    दारणातून सध्या 3196 क्यूसेस एवढ्या पाण्याचा विसर्ग..

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

  • 26 Jul 2021 08:43 AM (IST)

    सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप, जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण

    सातारा

    सातारा जिल्ह्यात पावसाची उघड झाप...

    पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मोठा दिलासा....

    जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण....

    कोयना धरणातून सध्या 32,749 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग

  • 26 Jul 2021 08:40 AM (IST)

    पश्चिम महाराष्ट्राचा पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार साताऱ्यात, कोल्हापूर, सांगलीचीही पाहणी करणार

    सातारा: पश्चिम महाराष्ट्राचा पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा येथे दाखल.....

    सातारा शासकीय विश्रामगृह येथून थोड्याच वेळात हेलिकॉप्टर मधून कोल्हापूरकडे होणार रवाना

    पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली याठिकाणी पूरभागांची करणार पाहणी.....

    पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता.. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार यांची आढावा बैठक

  • 26 Jul 2021 07:32 AM (IST)

    ठाकरे सरकार नियोजनशून्य, सरकार सर्व स्तरावर फेल : चंद्रशेखर बावनकुळे

    औरंगाबाद :-

    पूरपरिस्थितीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांचे सरकारवर घणाघाती आरोप

    ही नैसर्गिक आपत्ती असली तरी सुलतानी आपत्ती.

    राज्य सरकारने जर नियोजन केले असते तर एवढे जीव गेले नसते

    सरकार नियोजन शून्य,सरकार संवेदनशील नसते तेव्हा अश्या जीव हानी आणि नैसर्गिक आपत्त्या येतात

    या सरकारची कुठल्याही प्रकारची मदत पूरग्रस्तांना नाही

    मुख्यमंत्री मुंबई तर अजित पवार पुणे आणि बारामती च्या बाहेर निघायला तयार नाही

    सर्व स्तरावर हे सरकार फेल झालेय

    तीन चाकाचा रिक्षा पंचर झालाय, या रिक्षाचे एव्हडे पुरजे उडणार की कुणी याचे स्क्रॅप पण विकत घेणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • 26 Jul 2021 06:43 AM (IST)

    तळीये दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढताच

    रायगड महाड

    तळीये दुर्घटनेतील एकुण बधीत व्यक्तींची सख्यां 89.

    म्रुत एकुण 53, पैकी 27 पुरुष व 26 स्त्रिया.

    (बालके)

    विघ्नेश विजय पांडे - 5 महीने. पार्थ सुनिल शिरवले - 1 वर्ष अवनी सुनिल शिरावले - 5 वर्ष मनाली विजय पाडें - 7 वर्ष करण देवेद्रं यादव - 8 वर्ष

    अद्याप गायब एकूण 31, पैकी 14 पुरुष, 17 स्त्रीया.

    (सान्वी संकेज जाधव, वय १ वर्ष)

    जखमी अवस्थेत उपचार सुरु एकूण 5, त्यात 2 पुरुष 3 स्त्रिया

Published On - Jul 26,2021 6:32 AM

Follow us
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.