AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : दोनच मुलांवर थांबा… देवाची नाही, आपलीच कृपा असते; अजितदादा यांची मिश्किल टोलेबाजी

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची चर्चा झाली. निवृत्त न्यायाधीश शिंदे यांची समिती नेमली आहे. ते अभ्यास करत आहेत. सर्व पक्षीयांची बैठक घेतली. सर्वांनी सांगितलं 52 टक्के आरक्षणाला धक्का न देता राहिलेल्यामधून आरक्षण द्या. आमचा पाठिंबा आहे.

Ajit Pawar : दोनच मुलांवर थांबा... देवाची नाही, आपलीच कृपा असते; अजितदादा यांची मिश्किल टोलेबाजी
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2023 | 2:50 PM
Share

सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर | 23 ऑक्टोबर 2023 : वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल भाष्य केलं आहे. दिवसे न् दिवस पिढी वाढते तसं शेतीत तुकडे पडतात. त्यामुळे शेतकरी अल्पभूधारक होतो. कुणी थांबायलाच तयार नाही. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण 35 कोटी होतो. आता 140 कोटी झालो आहोत. चौपट लोकसंख्या वाढली. आपण एकदोन अपत्यावर थांबलं पाहिजे. सर्व समाजाने दोन मुलावर थांबलं पाहिजे. कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेलं नाही. देवाची कृपा.. देवाची कृपा… काही देवाची कृपा नसते. आपलीच कृपा असते, अशी मिश्किल टोलेबाजी अजित पवार यांनी केली.

अजित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पार पडलेल्या सभेला ते संबोधित करत होते. मराठा आरक्षणाची गेल्या 63 वर्षात कधी मागणी नव्हती. विलासराव देशमुख असताना आरक्षणाच्या मागणीने डोकं वर काढलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आरक्षण द्यायचा निर्णय झाला. आम्हाला जो सल्ला देण्यात आला त्या पद्धतीने आम्ही आरक्षण दिलं. पण कोर्टात टिकलं नाही. नंतर फडणवीस यांचं सरकार आलं. त्यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

मीही मराठाच

कुणबी प्रमाणपत्र द्या असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. ओबीसीत 350 जाती आहेत. कुणबीही आहेत, त्यांना आरक्षण आहे. विदर्भात देशमुखांना आरक्षण आहे. निजामशाहीतील काळातील रेकॉर्ड तपासायला सांगितलं. तोही प्रयत्न सुरू आहे. मीही मराठा समाजाचा आहे. दुसऱ्या समाजाचा नाही. मलाही समाजातील गरीब वर्गाला आरक्षण मिळावं वाटतं. आमच्या मुलामुलींना आरक्षणाची गरज नाही. पण समाजातील एका वर्गाला आरक्षणाची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

राज्यातील आरक्षण 62 टक्क्यांवर

आपल्या राज्यात 52 टक्के आरक्षण आहे. आदिवासी, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि भटक्यांना हे आरक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे आरक्षण एकूण 62 टक्के झालं. आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले. आम्हीही त्या मोर्चात असायचो. कोणताही बोर्ड नसायचा. सकल मराठा समाज या बॅनरखाली सर्व एकवटले होते, असं ते म्हणाले.

52 टक्के समाज बिथरेल ना

आम्ही राज्यकर्ते आहोत. आम्ही आरक्षण दिलं आणि टिकलं नाही तर लोक म्हणतील आम्हाला फसवतात. बनवतात. अशाच पद्धतीने समाजाचा दृष्टीकोण होईल. त्यामुळे दूधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पितो तसा प्रयत्न सुरू आहे. आज समजून घेण्याची मानसिकता मराठा तरुण-तरुणीची राहिली नाही. कुणालाही नाऊमेद करण्याचा आमचा प्रयत्न नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडियात आमच्याबद्दल काहाही पसरवलं जातं. आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत. पण आता दिलेल्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण द्यायचं आहे. नाही तर 52 टक्के समाज बिथरेल ना, असं ते म्हणाले.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?