AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी उपमुख्यमंत्री असलो, तरी टॅक्स भरावे लागतात; गिरीश प्रभुणेंना नोटीस प्रकरणी अजित पवारांची चौकशीची ग्वाही

गिरीश प्रभुणे यांच्या बाबतीत मी माहिती घेतो आणि अन्याय झाला असेल तर चौकशी करु" अशी माहिती अजित पवार यांनी दिली. (Ajit Pawar Girish Prabhune)

मी उपमुख्यमंत्री असलो, तरी टॅक्स भरावे लागतात; गिरीश प्रभुणेंना नोटीस प्रकरणी अजित पवारांची चौकशीची ग्वाही
| Updated on: Jan 30, 2021 | 2:41 PM
Share

शिर्डी : केंद्र सरकारकडून ‘पद्मश्री’ने (Padma Award) सन्मानित सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे (Girish Prabhune) यांना पिंपरी चिंचवड महापालिकेने मालमत्ता कराची नोटीस पाठवल्याने राजकीय वादंग निर्माण झाला आहे. मी उपमुख्यमंत्री असलो, तरी जिथे राहतो तिथले टॅक्स भरावे लागतात, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. (Ajit Pawar reacts on Girish Prabhune tax notice by Pimpri Chinchwad Municipality)

“गिरीश प्रभुणे यांना पाठवलेल्या नोटिसीबद्दल मला माहिती नाही. सध्या पालिका आयुक्त रजेवर गेले असल्याने मी ते आल्यावर माहिती घेईन. कोणाला कोणता पुरस्कार मिळाला, तरी प्रत्येकाने आपले रेकॉर्ड क्लीअर ठेवले पाहिजेत. मीसुद्धा उपमुख्यमंत्री असलो, तरी आम्ही ज्या शहरात राहतो, तिथले टॅक्स भरावे लागतात. गिरीश प्रभुणे यांच्या बाबतीत मी माहिती घेतो आणि अन्याय झाला असेल तर चौकशी करु” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया

गिरीश प्रभुणे करवसुली संदर्भात मी आयुक्तांशी बोलले. 2008 मध्ये जी अनधिकृत बांधकामे पिंपरीत निर्माण झाली, त्याला शासकीय कर लावण्यात आलेला आहे, तो कर न दिल्यामुळे 5 हजार चौरस फुटांपेक्षा अधिक असणाऱ्या मालमत्तेवर व्याजासकट अधिक रक्कम लावण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

गिरीश प्रभुणे यांची शैक्षणिक संस्था असल्यामुळे, ब्ल्यू लाईनमध्ये बांधकाम असल्यामुळे शैक्षणिक कामाचा विचार करून अधिकाधिक सहानुभूतीने विचार करून त्यातून काय तोडगा काढला येईल का, ते पहावं, असं मी आयुक्तांना निर्देश दिल्याचं गोऱ्हेंनी सांगितलं. राज्य सरकारने कर माफ करण्यासंदर्भातला प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करून घ्यावा लागेल. त्याबद्दल सरकारची सकारात्मक भूमिका असावी अशा मी सूचना देणार असल्याचंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?

गिरीश प्रभुणे यांच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम (Punrutthan Samarasata Gurukulam) या त्यांच्या संस्थेला महापालिकेची मालमत्ता कर भरण्यासंबंधी नोटीस आली आहे. 1 कोटी 83 लाख रुपये मालमत्ता कर भरण्याची ही नोटीस आहे. 21 जानेवारीला महापालिकेडून ही नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर 25 जानेवारीला प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला होता. 1 लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्या सगळ्यांनाच ही नोटीस पाठवण्यात आली होती, अशी भूमिका महापालिकेने घेतली होती. (Ajit Pawar reacts on Girish Prabhune tax notice by Pimpri Chinchwad Municipality)

नोटीसीवरुन आशिष शेलारांनी महापालिका आयुक्तांना झापले

महापालिकेच्या आयुक्ताचं डोकं ठिकाणावर आहे का? या प्रशासकिय बाबींमध्ये ज्या पद्धतीने बील काढली जातात आणि पाठवली जातात हे काही सत्तेत बसलेल्या महापौरांच्या निदर्शनास आणून काढली जात नाही. पण आयुक्तांनी प्रशासकिय काम करताना डोकं ठिकाणावर ठेऊ काम केलं पाहिजे. आमची मागणी आहे की पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांवर कारवाई करा आणि महापौरांना माझं निवेदन असेल की प्रभुणे यांना पाठवलेल्या बिलावर स्थगिती द्या, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

गिरीश प्रभुणे यांची ओळख…

गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. प्रभुणे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उत्थानासाठी कार्य करत आहेत. पारधी समाजातील मुलांना शिक्षण मिळावं, त्यातही पारधी समाजातील मुलींना शिक्षण मिळावं, पारधी समाजाचं पुनर्वसन व्हावं यासाठी प्रभुणे कार्य करत आहेत. त्यासाठी त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ही संस्था कार्यरत आहे. पारधी समाजाच्या मुलांसाठी त्यांनी वसतिगृहही सुरू केले आहे. या गुरुकुलमध्ये पारधी समाजातील 200 मुले आणि 150 मुली शिकत आहेत. प्रभुणे यांनी 1970 पासून पारधी समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या :

आधी महापालिकेची कर थकबाकीची नोटीस, नंतर केंद्राचा पद्मश्री, पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वाद

(Ajit Pawar reacts on Girish Prabhune tax notice by Pimpri Chinchwad Municipality)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.