AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khed Shivapur toll : खेड-शिवापूर टोल नाका हटवा, अन्यथा…; कृती समिती आक्रमक, पुण्यातल्या कात्रज चौकात आंदोलन

25 किलोमीटरच्या टप्प्यासाठी 80 किलोमीटरचा टोलवसुली करण्यात येत आहे. ज्या महामार्गाच्या कामाचे टेंडर 2010 रोजी झाले होते, त्याचे काम हे 2012पर्यंत पूर्ण करण्याची हमी देण्यात आली होती, तरीदेखील 10 वर्ष होऊनसुद्धा अद्याप काम पूर्ण होऊ शकलेले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

Khed Shivapur toll : खेड-शिवापूर टोल नाका हटवा, अन्यथा...; कृती समिती आक्रमक, पुण्यातल्या कात्रज चौकात आंदोलन
खेड शिवापूर टोलनाक्याविरोधात कृती समितीचे आंदोलन आणि सह्यांची मोहीमImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 2:59 PM
Share

पुणे : पुणे-सातारा मार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील (Khed Shivapur toll plaza) टोल वसुली बंद करावी आणि टोल नाका हटवावा, या मागणीसाठी खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीने पुण्यातील कात्रज (Katraj) चौकात आंदोलन केले. आंदोलनाच्या दरम्यान टोल प्रशासन आणि एनएचएआय विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही, तर आंदोलन (Agitation) आणखी तीव्र केले जाणारे असल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आली आहे. कृती समितीची एप्रिल महिनाअखेर एक बैठक झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र दिनी आंदोलन करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आज हे आंदोलन करण्यात आले. सह्यांची मोहीमही राबविण्यात आली. हा टोल नाका नागरिकांची लूटमार करत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

काय आहे वाद?

25 किलोमीटरच्या टप्प्यासाठी 80 किलोमीटरचा टोलवसुली करण्यात येत आहे. ज्या महामार्गाच्या कामाचे टेंडर 2010 रोजी झाले होते, त्याचे काम हे 2012पर्यंत पूर्ण करण्याची हमी देण्यात आली होती, तरीदेखील 10 वर्ष होऊनसुद्धा अद्याप काम पूर्ण होऊ शकलेले नाही. टोलनाक्यावर 1 मार्चपासून पुन्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड वाहन चालकांकडून टोल वसुली सुरू केली गेली आहे. यामुळे पुणेकर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून टोलनाक्यावर वादविवाद रोज होत आहेत. दरम्यान, भोर वेल्हा आणि हवेली येथील स्थानिकांना सूट देत आहोत, असे टोल प्रशासन आणि NHAIकडून सांगण्यात येत आहे. ही शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीची आणि लोक प्रतिनिधींची फसवणूक असल्याचे कृती समितीने म्हटले होते. या विषयावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला कृती समितीकडून निवेदनही देण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधींवरही टीका

पुणेकरांची बाजू कृती समितीने आंदोलनात वारंवार मांडली आहे . मात्र पुणेकरांचे लोकप्रतिनिधी प्रतिसाद देणार नसतील तर सामान्य जनतेसोबत ही लढाई लढावी लागेल. मात्र लोक प्रतिनिधींची टोलनाक्यांबाबतची अनास्था अनाकलनीय असल्याची टीका कृती समितीचे समन्वयक माऊली दारवटकर यांनी केली आहे. तर पुणे शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुण्याच्याच्या टोल मुक्तीसाठी संघटित व्हा, अन्यथा शिवापूर टोलनाक्याचे भूत पुणेकरांच्या मानगुटीवर कायमस्वरूपी बसेल असा इशारा देण्यात आला आहे.

कृती समितीचे आंदोल आणि सह्यांची मोहीम

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.