अमोल कोल्हेंची कोल्हेकुई सुरू, नेमकं दु:ख कशाचं? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?; आनंद दवे यांचा सवाल

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे एअरपोर्ट ऑथेरिटीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण करून दिली आहे.

अमोल कोल्हेंची कोल्हेकुई सुरू, नेमकं दु:ख कशाचं? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्याची असण्याचं?; आनंद दवे यांचा सवाल
anand dave
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 7:36 PM

पुणे: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे एअरपोर्ट ऑथेरिटीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण करून दिली आहे. पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे, असं कोल्हे यांनी म्हटलं होतं. त्याला ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोल्हेंना नेमकं दु:ख कशाचं आहे? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्यांची असण्याचं? असा सवाल आनंद दवे यांनी केली आहे.

अमोल कोल्हे यांना दुःख कशाचं आहे? शिवाजी महाराजांच्या प्रतिमा नसण्याचं की पेशव्यांची असण्याचं? पुणे विमानतळावर पेशव्यांचा उल्लेख असण्याने कोल्हेकुई सुरु झाली आहे. केवळ विमानतळवरच नाही तर संपूर्ण पुणे शहरांत छत्रपतींच्या प्रतिमा, पुतळे असावेत ही आमची आधी पासूनचीच भूमिका आहे, असं आनंद दवे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

कोल्हेंच्या पोटात का दुखतं?

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणारे, सर्वत्र त्यांचाच उल्लेख करणाऱ्या नेत्यांनाच महाराजांचा विसर पडलाय हे पावलोपावली जाणवते आम्हाला. एवढी वर्ष केंद्रात सत्तेवर असून अगदी नागरी उड्डाण मंत्रिपद असून सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळासाठी हवे तसे प्रयत्न का केले नाहीत? आता सुद्धा त्यासाठी कोल्हे यांनी प्रयत्न करावे. आमच्या शुभेच्छा आहेत. पण शहरातील पेशव्यांचे हे एकमात्र शिल्प असताना ते कोल्हे यांच्या पोटात का दुखतं हे आम्हाला कळत नाही?, असा टोलाही त्यांनी लगावला.

नेमकं प्रकरण काय?

पुणे विमानतळावर काही पेंटिंग्ज काढण्यात आल्या आहेत. त्यात पेशव्यांच्या पेटिंग्ज आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांवरील एकही पेंटिग्ज नाही. त्यामुळे अमोल कोल्हे अत्यंत संतप्त झाले आहेत. त्यांनी ट्विटरवरून याबाबत पुणे विमानतळ प्राधिकरणाला जाब विचारला आहे. पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय?, असा सवाल कोल्हे यांनी केला आहे. विमानतळावरील पेंटिंग्जसोबतचा सेल्फी आणि एक फोटोही कोल्हेंनी ट्विटरवर शेअर केला आहे.

ज्या पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा‌ जन्म झाला तो किल्ला, पुण्यात‌ त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली तो लाल महाल, तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष असणारा सिंहगड आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे, असं सांगतानाच शिवाजी महाराजांचं कर्तृत्व पुणे विमानतळावर का दिसत नाही. शिवाजी महाराज, संभाजी‌ महाराज यांचा इतिहास सांगणारं विमानतळावर काहीच नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

संबंधित बातम्या:

Breaking : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत, पिचड आणि कुटुंबियांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप!

Leopards in Katraj Ghat: कात्रज घाटात बिबट्याचा मुक्तसंचार ; संरक्षक भिंतीवर बसलेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद

omicron alert | पिंपरीत नायजेरियाहून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.