अण्णांचा संयम सुटला, मोदींना पत्र; उपोषणाचा इशारा

देशात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्यावर केंद्र सरकारने कोणताही तोडगा न काढल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा संयम सुटला आहे. (Anna Hazare to begin indefinite hunger strike)

अण्णांचा संयम सुटला, मोदींना पत्र; उपोषणाचा इशारा
Anna hazare

नगर: देशात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्यावर केंद्र सरकारने कोणताही तोडगा न काढल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा संयम सुटला आहे. सत्तेसाठी तुमचं सरकारने सत्याला वाऱ्यावर सोडलं आहे, असं सांगत अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हा इशारा देतानाच सरकारला स्वामिनाथन आयोगाची आठवणही करून दिली आहे. (Anna Hazare to begin indefinite hunger strike)

अण्णा हजारे यांनी या पत्रात स्वामिनाथ आयोगासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधण्याचं काम केलं आहे. स्वामिनाथन आयोगाने पीक उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा शेतकऱ्यांना देणअयाची शिफारस केलेली आहे. तुम्हीही मला 29 मार्च 2018 रोजी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसारच निर्णय घेण्याचं लिखित आश्वासन दिलं होतं. परंतु, अद्याप हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. सरकार जर मागण्या पूर्ण करू शकत नाही तर त्यांनी खोटी आश्वासने देऊ नयेत, असं आमचं म्हणणं आहे. देशातील सरकारने सत्तेसाठी सत्य त्यागने बरे नाही. त्यामुळे देशातील जनतेपर्यंत चुकीचा संदेश जातो. जी गोष्ट करता येत नाही, ती करता येत नसल्याचं सरकारने स्पष्ट सांगायला हवं. त्यामुळे किमान मागणी करणारे लोक तो विषय सोडून तरी देतील. परंतु, जेव्हा सरकार अडचणीत येते तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना खोटी आश्वासने द्यावी लागतात, असं सांगतानाच मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही. त्यामुळेच सरकारचं हे वेळकाढू धोरण मला त्रासदायक वाटतं, असं अण्णांनी म्हटलं आहे.

म्हणून शेतकरी आत्महत्या करतात

शेतकऱ्यांच्या पिकांवरील उत्पादन खर्चाचे मूल्य 50 टक्कायाने वाढवून देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असं मला आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चच मिळत नाही तर त्यावर 50 टक्के वाढवून देण्याचा प्रश्नच येत नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे, याकडेही अण्णांनी मोदींचं लक्ष वेधलं आहे. यावेळी केंद्र सरकारच्या संवेदनशीलतेवरही अण्णांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकार शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील आहेत तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत अनेक कारणं आहेत. राज्य कृषी आयोग वेगवेगळ्या पिकांचा उत्पादन खर्चाची आकडेवारी केंद्र सरकारच्या कृषी विभागाला पाठवत असतो. पिकांचा उत्पादन खर्च ठरवण्यासाठी कृषी आयोगावर कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ असतात. त्यांनी दिलेल्या अहवालात कपात करता कामा नये. मात्र, तुमचे सरकार त्यात 50 ते 55 टक्के कपात करते. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, असा दावाही त्यांनी काला आहे.

कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता द्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि शेतकऱ्यांच्या पिकांना उत्पादन खर्च योग्य मिळावा यासाठी निवडणूक आयोगाच्या धर्तीवर कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता दिली पाहिजे. या आयोगाला संवैधानिक दर्जा दिला पाहिजे, अशी मी मागणी केली होती. त्यावर उच्च स्तरीय तज्ज्ञांची समिती स्थापन करून निर्णय घेण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. परंतु, हे आश्वासनही पूर्ण करण्यात आलेलं नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. (Anna Hazare to begin indefinite hunger strike)

भाजीपाला, फळ, फूल, दुधावर एमएसपी निर्धारित करण्याचंही आश्वासन दिलं होतं. 6 हजार कोटी रुपये खर्च करून कोल्ड स्टोरेज बनविण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. परंतु, तीन वर्षे होऊन गेलीत कोणतंही आश्वासन पूर्ण केलं गेलं नाही. त्यामुळे शेतकरी हा सर्व माल रस्त्यावर फेकत आहेत. हे पाहून प्रचंड वेदना होत आहेत, असं सांगतानाच मी कधीच कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाच्या विरोधात कधी आंदोलन केलं नाही. केवळ समाज, राज्य, राष्ट्राच्या भल्यासाठी जीवाची पर्वा न करता आंदोलन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आंदोलन करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Anna Hazare to begin indefinite hunger strike)

 

संबंधित बातम्या:

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

दिल्ली बॉर्डरवर पोहोचले हजारो शेतकरी, आज मोठ्या आंदोलनाची शक्यता

जयंत पाटील म्हणतात, ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी अव्वल, काँग्रेस चौथी!

(Anna Hazare to begin indefinite hunger strike)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI