AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षणावर बोलताना आशिष शेलारांचं पवार-ठाकरेंना आवाहन; म्हणाले साहेबांचं मौन…

Ashish Shelar on Maratha Reservation : शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार आज एकाच मंचावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी आरक्षणावर भाष्य केलं. त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक विधान केलं आहे. यावेळी आशिष शेलार काय म्हणाले? वाचा...

आरक्षणावर बोलताना आशिष शेलारांचं पवार-ठाकरेंना आवाहन; म्हणाले साहेबांचं मौन...
शरद पवार, आशिष शेलारImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 12, 2024 | 7:57 PM
Share

पुण्यात आज शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आज झालं. या सोहळ्यासाठी शरद पवार आणि आशिष शेलार एकत्र आले होते. पुण्यातील मोदीबागेत या नवीन कार्यालयाचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारही उपस्थित होते. आशिष शेलार यांनी या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधाल. तेव्हा राज्यात चिघळलेल्या आरक्षण प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला त्यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे.

शेलार आरक्षणावर काय म्हणाले?

आमचा प्रश्न पुन्हा पवार साहेबाना तोच आहे की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. मनोज पाटील यांची जी भूमिका आहे त्यावर तुमची आणि महाविकास आघाडीची भूमिका काय आहे? उद्धव ठाकरे, काँग्रेस यांना सुद्धा माझा तोच प्रश्न आहे. शरद पवारसाहेबांचं मौन योग्य नाही… तुमचं सरकार मनोहन सिंह यांच्या काळात का नाही निर्णय घेतला? तुम्ही मंत्री असताना हे का केलं नाही. आज ही कायद्यात 50 टक्के पेक्षावर जाता येईल पण ते सिद्ध करावं लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर म्हणाले…

मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी योग्य आहे. भाजपचं त्याला समर्थन आहे. आंदोलनकर्ते आणि त्यातील वक्तव्य, त्याचे बोलावते धनी याचं समर्थन होणार नाही. मनोज पाटील यांनी आमचं मत समजून घ्यायला हवं. शरद पवार काँग्रेस सरकार यांच्यावर तुम्ही का टीका करत नाही? देवेंद्र फडणवीस यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं, त्यांच्यावर का टीका करता? राज्यात एकनाथ शिंदे सरकार आहे. मग फक्त फडणवीस यांच्यावर का टीका करता? एकेरी टीका फडणवीस यांच्यावर करणं याचा आम्ही निषेध करतो, असंही आशिष शेलार म्हणालेत.

आज एमसीएच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे. बीसीसीआय खजिनदार म्हणून मी इथे आलो होतो. मध्यभागी असलेल्या कार्यालयामुळे नक्कीच सगळ्यांना अपेक्षा पूर्ण होतील. क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये, असंही आशिष शेलार म्हणाले. दरम्यान आज उद्घाटन झाल्यानंतर आता या नवीन कार्यालयातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं कामकाज चालणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पुण्यातील क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी एक मोठी संधी असणार आहे. पुण्यातील स्टेडियममध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंडटेस्ट मॅच सामने पार पडणार आहेत.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.