AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे विमानतळावर कर्मचारी अन् प्रवाशांमध्ये जोरदार राडा, काय आहे कारण?

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या गोफर्स्टच्या विमानास उशीर झाला. बोर्डिंग गेटवरील काउंटरवर एकही कर्मचारी नव्हता. यामुळे संध्याकाळी ७.४० वाजता विमानात चढण्याचे सांगण्यात आले.

पुणे विमानतळावर कर्मचारी अन् प्रवाशांमध्ये जोरदार राडा, काय आहे कारण?
Image Credit source: Google
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 30, 2023 | 10:28 AM
Share

पुणे : पुणे विमानतळावर (Pune AirPort) विमान कंपनीचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये जोरदार हंगामा झाला. विमानाची वेळ झाली होती. यामुळे प्रवाशांना विमानात बसवण्यात आले. त्यानंतर विमान गरम झाल्याचे कारण देत उतरवण्यात आले. दुपारी असणारी ही फ्लाइट संध्याकाळी रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे स्पाईसजेट कंपनीचे (Spicejet)कर्मचारी व प्रवाशांमध्ये वादावादी झाली. पाच तासांच्या उशिरानंतर विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशी चांगलेच संतापले होते.

पुणे येथून अहमदाबादला जाणारे विमान दुपारी अडीच वाजता उड्डाण करणार होते. परंतु काही कारणामुळे ते टेक ऑफ करू शकले नाही. प्रवासी विमानतळावर विमानाची वाट पाहत थांबवले होते. त्यानंतर संध्याकाळी 7.15 वाजता विमान रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विमानतळावर विमानाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. त्यानंतर स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांशी त्यांची वादावादी झाली. तत्पूर्वी, विमानात प्रवाशांना बसवल्यानंतर विमान गरम झाले. यामुळे प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.

पुणे दिल्ली विमानाला उशीर

पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या गोफर्स्टच्या विमानास उशीर झाला. बोर्डिंग गेटवरील काउंटरवर एकही कर्मचारी नव्हता. यामुळे संध्याकाळी ७.४० वाजता विमानात चढण्याचे सांगण्यात आले.

यापुर्वी झाला निष्काळजीपणा

यापुर्वी १२ जानेवारीलाही स्पाईसजेट या विमान कंपनीचा निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी दिल्ली विमानतळावर, प्रवाशांना बोर्डिंग गेट आणि बेंगळुरूला जाणार्‍या फ्लाइटमध्ये एक तासापेक्षा जास्त वेळ थांबायला लावलं होतं.सौमिल अग्रवाल नावाच्या ट्रॅव्हल ब्लॉगरने यासंदर्भात पोस्ट लिहिली होती.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना