AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Avinash Bhosale : अविनाश भोसलेंना दिलासा, मालमत्ता ताब्यात घेऊ नयेत; मुंबई उच्च न्यायालयाचे ईडीला आदेश

सीबीआयने आधी अटक केल्यानंतर ईडीनेही त्यांना कारवाईची नोटीस बजावली होती. या नोटिशीत त्यांना त्यांची पुण्यातली मालमत्ता रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी मनी लाँडरिंग प्रकरणात ही मालमत्ता ईडीने जप्त केली होती.

Avinash Bhosale : अविनाश भोसलेंना दिलासा, मालमत्ता ताब्यात घेऊ नयेत; मुंबई उच्च न्यायालयाचे ईडीला आदेश
अविनाश भोसले (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 09, 2022 | 4:53 PM
Share

पुणे : येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची मालमत्ता जप्त करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (ABIL) ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक, पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) हे आदेश देण्यात आले असून भोसलेंची मालमत्ता ताब्यात न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत निर्णय घेणार्‍या प्राधिकरणाने (AA) अलीकडेच भोसले आणि इतरांविरुद्ध नोंदवलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याच्या संदर्भात ईडीकडून मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यात मालमत्ता रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर भोसलेंनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्यावर सध्या सीबीआय आणि ईडीतर्फे कारवाई सुरू आहे.

मागील आठवड्यात पाठवली होती नोटीस

सीबीआयने आधी अटक केल्यानंतर ईडीनेही त्यांना कारवाईची नोटीस बजावली होती. या नोटिशीत त्यांना त्यांची पुण्यातली मालमत्ता रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. गेल्या वर्षी मनी लाँडरिंग प्रकरणात ही मालमत्ता ईडीने जप्त केली होती. या मालमत्तेची किंमत साधारण 4 कोटी 73 लाख इतकी आहे. अविनाश भोसले यांना सीबीआयने आधीच अटक केली होती. त्यात ईडीनेही मालमत्तेसंदर्भात नोटीस बजावली. मनी लाँडरिंग प्रकरणाव्यतिरिक्त ईडीने (ED) फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. तर येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी त्यांचा सीबीआयकडून तपास सुरू आहे.

प्रकरण काय?

येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये 3700 कोटी रुपये कर्जरोख्यांच्या माध्यमातून गुंतवले होते. यात राणा यांना 600 कोटींची दलाली मिळाली होती. तपासात हे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलने हे पैसे छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, भोसले यांच्या इन्फ्रा लिमिटेड आणि बलवा आणि गोएंकाच्या कंपनीत वळवले होते. याप्रकरणी छाब्रियांना अटक करताच भोसले, बलवा आणि गोएंका यांच्यावरही सीबीआयने छापेमारी केली होती. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (डीएचएफएल) येस बँकेकडून 750 कोटींचे कर्ज घेतले होते. पण त्याचा वापरच करण्यात आला नाही, असे तपासात समोर आले होते.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार