पिंपरीत खंडणी प्रकरणी भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांना मध्यरात्री अटक
1 लाखाची रक्कम देण्यास फिर्यादीने विरोध केल्याने त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याबाबत फिर्यादीने पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

Breaking News
पिंपरी – पिंपरी-चिंचवड बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा करण्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना पिंपरी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. अटकेच्या घटनेने शहारत खळबळ उडाली आहे. घोळवे यांनी व्यापाऱ्यांकडून गाळे मिळवून देण्यासाठी 55 हजारांची खंडणी घेतली. इतकेच नव्हेतर पुन्हा फिर्यादीकडं 1 लाख रुपयांची मागणी केली.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
