Pune Chandrakant Patil : मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला तर तुमची काय अडचण? चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

मशिदीवरचे भोंगे काढणार नसाल तर आम्ही हनुमान चालिसाचे भोंगे वाजवू, अशी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी पाठिंबा दिला, तर तुमची अडचण काय, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.

Pune Chandrakant Patil : मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला तर तुमची काय अडचण? चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला
अजानवरून शिवसेनेवर टीका करताना चंद्रकांत पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 10:45 AM

पुणे : मशिदीवरचे भोंगे काढणार नसाल तर आम्ही हनुमान चालिसाचे भोंगे वाजवू, अशी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी पाठिंबा दिला, तर तुमची अडचण काय, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. अजानचा अर्थ काय तो समजून सांगायला हवा. जे नमाजला येत नाही, त्यांना येण्यास प्रवृत्त करा. मशिदींमध्ये भोंगे लावू शकता. त्याचा आवाज बाहेर जाता कामा नये. म्हणजेच नमाज (Namaz) अदा करणाऱ्यांसाठी आतमध्ये व्यवस्था करा. महिला अजानला येत नाहीत. तर त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी. अलिकडे स्मार्टफोन आले आहेत. त्यामध्ये नमाज टाकला येईल. मात्र अशा मुद्द्यांमधून का वाद निर्माण केले जात आहेत, हे कळत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘मारून मुटकूनची सहानुभूती’

शिवसैनिकांची सहानुभूती मारून मुटकून मिळवताहेत, अशी टीकादेखील चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. सर्वसामान्यांची सहानुभूती हनुमान चालिसाचा आग्रह धरणाऱ्या राज ठाकरेंविषयीच आहे. काय प्रॉब्लेम आहे यांचा हे समजत नाही. अजानच्या बाबतीत काही नियमावली आहे. मशिदींच्या आत ऐकायला काहीच समस्या नाही. मात्र ज्यांचा काहीच संबंध नाही, त्यांना तुम्ही कशाला ऐकवता, असा सवाल यावेळी त्यांनी केला.

‘कितीही हल्ले केले तरी घाबरणार नाही’

माझ्या घरासमोर कोणी पूजा सांगायला आले तर मी म्हणेन बाहेर का, घरात या. आम्ही प्रसादाची सोय केली असती. अशी टीका त्यांनी केली. प्रत्येकवेळी भाजपावर टीका करतात. सध्या ऊन पण खूप आहे. यामागेसुद्धा भाजपाचा हात आहे असे म्हणतील, असेही ते म्हणाले. तर आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही चळवळीतले लोक आहोत. कितीही हल्ले केले तरी घाबरणार नाही, असे ते म्हणाले.

आणखी वाचा :

Rana vs Thackeray : ‘भीमरुपी महारुद्रा…’ हनुमान चालिसेला मारुतीस्तोत्रानं शिवेसनेचं प्रत्युत्तर! राणांच्या घराबाहेर ‘बोल बजरंग बली की जय’

Mohit Kamboj Car attack : ‘कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि हत्यारं होती’ विनायक राऊतांचा सनसनाटी आरोप

Rana vs Thackeray : शिवसैनिक रवी राणांच्या इमारतीत घुसले! ‘आम्ही त्यांना सोडणार नाय’ शिवसैनिक आक्रमक

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.