भरसभेत देवेंद्र फडणवीस कुणाला I Love You म्हणाले?; सभेत एकच हशा…
BJP Leader Devendra Fadnavis Pune Sabha Speech Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक होतेय. अशात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात सभा झाली. या सभेतील फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होतेय.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ गोखलेनगरमध्ये सभा झाली. या सभेला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. देवेंद्र फडणवीस भाषणाला उपस्थित राहणार इतक्यात कार्यकत्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा एका कार्यकर्त्याने देवेंद्रजी, I Love You!, असं म्हटलं. त्यावर फडणवीस हसले. त्या कार्यकर्त्याने पुन्हा एकदा देवेंद्रजी, I Love You!, असं म्हटलं. त्यानंतर Love You Too, असं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. त्यानंतर एकच हशा पिकला. कार्यकर्ते पुन्हा घोषणाबाजी करू लागले. हा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.
देवेंद्र फडणवीसांचं पुणेकरांना काय आश्वासन?
देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. पुण्याच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागून आहे. नरेंद्र मोदींनी मेट्रोची सर्वात मोठी भेट दिली आहे. पुण्यात एक स्थानकावरून दुसऱ्या स्थानावर जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट असण्याची गरज आहे. रिंग रोडसाठी जमीन अधिग्रहण मोठ्या प्रमाणात झालं आहे. शहरापासून एमआयडीसीपर्यंत जाण्यासाठी डबल डेकर रोड आगामी काळात तयार करणार आहोत. शहराच्या बाहेर पडताना वाहतूक कोंडी मोठी होत असते. त्यासाठी डबल डेकर रोड तयार केला जाणार आहे. नदी सुधार प्रकल्पाला चालना दिली जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधकांवर हल्लाबोल
पुणे शहराची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे, ते मोदी आणि राज्य सरकारमुळे…नॅरेटिव्हने वातावरण करता येतं. पण निवडणुका जिंकता येत नाहीत. विरोधकांच्या भाषणात विकास कुठे दिसत नाही मी माझ्या भाषणात विकासाचा मुद्दा असता. ही निवडणूक जर मोदी आणि विकासावर गेली. तर त्यांना अडचण होणार आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात म्हटलं.
पुणेकरांना काय शब्द?
पुणे विमानतळाचे विस्तारीकरण करणार आहोत, ते अंतिम टप्यात आहे. पुरंदरचे विमानतळ आम्ही करणार आहोत. वाढवण बंदरला।मुंबईचे तिसरे विमानतळ करणार आहोत. पुण्याच्या विकासाकरता पुरंदर विमानतळ करणार आहोत, असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला.
