AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊत मोठा माणूस, पण निकालानंतरच काय ते कळेल,’ पुणे पालिका निवडणुकीवरुन गिरीश बापट आक्रमक

पुणे माहपालिकेत भाजपचीच सत्ता येणार. इतर ठिकाणी काय परिस्थिती झाली हे राऊतांना माहिती आहे. राऊत माझ्यापेक्षा मोठा माणूस आहे. पण संजय राऊत यांना निवडणुकीनंतर काय ते कळेल, असा टोला बापट यांनी लगावला.

'संजय राऊत मोठा माणूस, पण निकालानंतरच काय ते कळेल,' पुणे पालिका निवडणुकीवरुन गिरीश बापट आक्रमक
GIRISH BAPAT SANJAY RAUT
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 2:25 PM
Share

पुणे : पुण्यात शिवसेनेचाच महापौर होईल या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा भाजप खासदार गिरीश बापट यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “पुणे महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार. इतर ठिकाणी काय परिस्थिती झाली हे राऊतांना माहिती आहे. राऊत माझ्यापेक्षा मोठा माणूस आहे. पण संजय राऊत यांना निवडणुकीनंतर काय ते कळेल,” असा टोला बापट यांनी लगावला.

पुण्यात भाजपची एकहाती सत्ता 

“पुणे महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार आहे. इतर ठिकाणी शिवसेनेची परिस्थिती काय झाली हे संजय राऊत यांना माहीत आहे. संजय राऊत ही मोठी व्यक्ती आहे. पण राऊत यांना या निवडणुकीनंतर कळेल. महाविकास आघाडी आणि अजित पवार यांनी पुणे पालिकेत लक्ष घातलं तरी येथे भाजपचीच एकहाती सत्ता येणार आहे,” असे गिरीश बापट म्हणाले.

दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या

तसेच पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना नेते यांची  केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सुरु असलेली चौकशी  या संदर्भातदेखील भाष्य केलं. त्यांनी राजकारणाची पातळी घसरता कामा नये. आयकर विभागाने कारवाई केली असेल तर त्याला सामोरं जाऊन उत्तर देता येतं. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. लहान मुलांसारखं भांडत बसता कामा नये, असेदेखील गिरीश बापट म्हणाले.

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 99 राष्ट्रवादी – 42 काँग्रेस – 10 सेना – 10 मनसे – 2 एमआयएम – 1 एकूण जागा – 164

मनसे पुणे मनपा स्वबळावर लढवणार का?

दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करायची की नाही, हा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ, असे सूचक वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकर यांनी केले होते. महापालिका निवडणुकीत मनसे ‘एकला चलो रे’ असणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी फार बोलण्याचे टाळले. त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मोघम वक्तव्य त्यांनी केले होते. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला होता.

इतर बातम्या  :

कामठीत लवकरच बुद्धिस्ट थीम पार्कचा प्रकल्प राबवू; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंना 6 पानी पत्रं, दसरा मेळाव्यातल्या हजेरीबाबतही मोठा निर्णय

पद्मसिंह पाटलांनी बहीण दिली, घरचे सांगायचे, पोरगं डायरेक्टरयं, अजित पवारांनी सांगितला लग्नाचा किस्सा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.